वालचंद महाविद्यालयाजवळच्या अतिक्रमणांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

सांगली : विश्रामबागमधील वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या जवळच्या रस्त्यावरील खोक्‍यांच्या अतिक्रमणांवर आज महापालिकेचा हातोडा पडला. यामध्ये आठ खोकी काढण्यात आली. यामुळे स्फूर्ती चौकापर्यंतचा रस्ता रुंद होणार आहे. वालचंद महाविद्यालयाच्या जवळून स्फूर्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही खोकी होती. सदरची जागा महापालिकेच्या नावावर झाल्याने या खोक्‍यांचे अतिक्रमण काढण्याची नोटीस खोकीधारकांना यापूर्वीच बजावली होती. मात्र, प्रकरण न्यायालयात गेल्याने त्याला स्थगिती मिळाली होती. 

न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या बाजूने निकाला दिला आहे. त्यामुळे खोकी हटवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आज सकाळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी पथकासह वालचंद शेजारच्या रस्त्यावरील
अतिक्रमित खोकी हटवण्यास प्रारंभ केला. यावेळी काही खोकीधारकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाचा निकाल असल्याने त्यांचा विरोध फार चालला नाही. खोकीधारकांच्या वकिलानेही अतिक्रमण विभागाला
कारवाईपासून रोखण्याचा प्रयत्न केला.

अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या सहाय्याने खोकी पाडून टाकली. तर दोन खोकीधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. दुपारपर्यंत ही खोकी काढण्याचे काम सुरु होते. यावेळी दोन्ही बाजूला रस्ता वाहतुकीस बंद केला होता. त्यानंतर अतिक्रमणात काढलेले पत्रे तसेच इतर साहित्य मिरजेतील
पंपिंग स्टेशन येथे नेऊन टाकण्यात आले. अतिक्रमण विभागाचे प्रमुख दिलीप घोरपडे म्हणाले, न्यायालयाने गेल्या महिन्यात महापालिकेच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे अतिक्रमण
काढण्यात येणार होतेच. न्यायालयाने निकाल दिल्याने आयुक्तांना विनानोटीस अतिक्रमण काढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आज ही मोहीम हाती घेण्यात आली. आता या रस्त्यावरील झाडे काढण्यासाठी उद्यान विभागास पत्र देण्यात येणार आहे. 

तसेच वीजेचे खांब काढण्यासाठी विद्युत वितरण विभागास पत्र देऊन कार्यवाही करण्याबाबत कळवण्यात येणार आहे. रस्ता साठ फुटी होणार स्फूर्ती चौकाकडून येणारा हा रस्ता सांगली-मिरज रोडला येऊन मिळतो. हा रोड विकास आराखड्यात 60 फुटी आहे. या रस्त्यावर एमएसईबी आणि वालचंद महाविद्यालयाची जागा आहे. ती मोकळी करुन देण्यास त्यांची तयारी असल्याचे घोरपडे म्हणाले, त्यामुळे हा रस्ता रुंद होईल आणि स्फूर्ती चौकातून खरे क्‍लब हाऊस शेजारुन जाणारा हा रस्ता प्रशस्त होईल. मात्र, त्यासाठी वालचंद आणि एमएसईबीने आपल्या जागा मोकळ्या करुन दिल्या पाहिजेत.

Web Title: Action Against Encroachment near Walchand College