सांगलीत दुकाने खासगी कार्यालयांवर आजपासून कारवाई : आयुक्त कापडणीस

Action against private shops in Sangli from today: Commissioner Kapdanis
Action against private shops in Sangli from today: Commissioner Kapdanis

सांगली ः कोरोना रुग्णसंख्येत जानेवारी-फेब्रुवारीच्या तुलनेत महापालिका क्षेत्रात चौपट वाढ झाली आहे. मार्चमध्ये तब्बल 805 नव्या कोरोना रुग्णांनी नोंद झाली आहे. ही वाढती संख्या पाहता पुन्हा एकदा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांनी तातडीने कोरोना नियमावलीचे पालन करावे, तसेच आजपासून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू होत आहे, असा इशारा आयुक्त नितिन कापडणीस यांनी दिला. संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिका यंत्रणा सुसज्ज असल्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. 


येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. कापडणीस म्हणाले, ""गतवर्षीच्या तुलनेत प्रशासन अनेक पातळ्यांवर आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सुसज्ज आहे. मात्र नागरिकांनी आपल्या वर्तन-व्यवहाराता बदल केले, तर ही आपत्ती टळू शकते. दुसऱ्या लाटेचाही आपण यशस्वीपणे मुकाबला करू शकतो. मागील महिनाभर प्रशासनाचा प्रबोधनावर भर होता.

मात्र आता दंडात्मक कारवाईला सुरवात होत आहे. पहिल्या टप्प्यात खासगी आस्थापनांमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश दिल्यास दुकान मालकांवर कारवाई होईल. विनामास्क फिरणाऱ्यांवरही कठोर कारवाई होईल. शासन नियमावलीप्रमाणेच दुकाने, हॉटेल्स सुरू राहतील. गृहअलगीकरणाचे नियम मोडून बाहेर पडणाऱ्या रुग्णांवरही फौजदारी गुन्हे दाखल होतील. अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभाग समन्वय समिती, सहायक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसही कार्यरत असतील. अशा भटक्‍या रुग्णांना जबरदस्तीने कोविड केअर सेंटरमध्ये भरती केले जाईल.'' 


जनआरोग्य विम्याचा लाभ प्रत्येकाला ! 
आयुक्त कापडणीस म्हणाले, ""महापालिका क्षेत्रातील पाच खासगी कोविड हॉस्पिटल्समध्ये प्रत्येक रुग्णांला महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी प्रत्येक केंद्रावर माहिती फलक लावले जातील. योजनेत समाविष्ट उपचारांची माहिती दिली जाईल. तक्रारींची दखल घेण्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलासाठी समन्वय अधिकारी नियुक्त केला आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक रुग्णालयात ठळकपणे प्रसिद्ध करणे बंधणकारक केले आहे.'' 

कोरोना सज्जता 

  •  शासकीय तंत्रनिकेतनमध्ये दोनशे रुग्णांचे कोविड केअर सेंटर कार्यान्वीत. 
  •  गरज पडल्यास अदिसागर कोविड रुग्णालया सुरू करणार 
  •  स्टेशन चौकात फक्त कोरोना रुग्णांसाठी मोफत ऍम्बुलन्स सेवा 
  •  "आरसीएचएम'सेंटर येथे महापालिकेची कोरोना वॉर रुम कार्यान्वित. 
  •  कोरोना नियमावली पालनासाठी महापालिका क्षेत्रात चार पथके 
  •  मनपाचे 14, शासकीय 2 आणि खासगी 14 अशा 29 ठिकाणी लसीकरण सुरू 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com