खानापूर नगरपंचायतीची मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई 

अनिलदत्त डोंगरे 
Saturday, 3 October 2020

कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रभावामुळे व "माझे कुटुंब माझी जबाबदारी' च्या अनुषंगाने खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत घरोघरी आरोग्य तपासणी सुरू आहे.

खानापूर : कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रभावामुळे व "माझे कुटुंब माझी जबाबदारी' च्या अनुषंगाने खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत घरोघरी आरोग्य तपासणी सुरू आहे. यातत घरातील सर्व व्यक्तींचा प्रामुख्याने ऑक्‍सिजन मोजला जातो. लहान मोठे आजार असतील तर त्यावर औषध दिले जातात. रोजच्या रोज आजारी माणसांची विचारपूस केली जाते. 

सध्या जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोनाने ग्रामीण भागात मुसंडी मारली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पहावयास मिळत आहे. खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतून मिळालेल्या माहितीनुसार आजअखेर खानापूर परिसरात 184 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 56 रुग्ण खानापूर येथील आहेत. आजअखेर 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी खानापुरातील पाच आहेत. आजअखेर कोरोना मुक्त झालेले 108 रूग्ण आहेत. त्यापैकी 33 खानापूर मधील आहेत. वीस लोकांना घरीच आयसोलेशनमध्ये ठेवून उपचार सुरू आहेत. खानापूर मध्ये 23 लोकांना होमआयसोलेशनमध्ये ठेवले आहे. त्यांच्यावर देखरेख व उपचार सुरू आहेत. 

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना इम्युनिटी वाढवण्याची औषधे विटामिन सी इत्यादी तसेच अँटिबायोटिक औषधे मास्क ग्लोज असे मेडी की मेडिसिन किट दिली जात आहे. रोज त्यांना बेंगलोर, जि. प. सांगली व तालुक्‍यावरून फोन येतो. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तपासणी व चौकशी केली जात असते दहा दिवसातून एक ते दोन वेळा वरिष्ठ मेडीकल अधिकाऱ्यांकडून सुद्धा भेट व चौकशी होत असते. नगरपंचायतीमार्फत जे लोक मास्क वापरत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against those who do not wear masks of Khanapur