
प्लॅस्टिक बंदीच्या मोहिमेत शहरातील विविध भागांतील दुकानांवर छापे घालून कारवाई करण्यात येत आहे. शहरातील मंगलगेट, मटन मार्केट, डाळ मंडई भागात बुधवारी दुपारी बारा ते दोन वाजेदरम्यान महापालिका पथकाने ही कारवाई केली.
नगर : महापालिकेचे प्रभारी आयुक्त, तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार शहरात प्लॅस्टिक बंदीची मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी (ता.12) शहरातील दुकानांची महापालिकेच्या पथकाने झाडाझडती घेतली. त्यात तीन दुकानांमध्ये प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्या. पथकाने या दुकानमालकांवर कारवाई करीत, 16 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
जाणून घ्या : राम शिंदे यांच्या याचिकेवर आमदार रोहित पवार म्हणतात..
प्लॅस्टिक बंदीच्या मोहिमेत शहरातील विविध भागांतील दुकानांवर छापे घालून कारवाई करण्यात येत आहे. शहरातील मंगलगेट, मटन मार्केट, डाळ मंडई भागात बुधवारी दुपारी बारा ते दोन वाजेदरम्यान महापालिका पथकाने ही कारवाई केली.
नगर : प्लॅस्टिक आढळून आल्याने दुकानदारास दंडाची पावती देताना महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक पी. एस. बीडकर, तुकाराम भांगरे, राज सामल, सुरेश वाघ आदी.
त्यात दर्डा प्लास्टिक, वाकोडीकर प्लास्टिक व मदहोश वाईन या तीन दुकानांमध्ये बंदी असलेले प्लॅस्टिक आढळून आले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करण्यात आला. शिवाय मटन मार्केटला अस्वच्छतेबाबत एक हजार रुपयांचा अतिरिक्त दंडही आकारण्यात आला.
हेही वाचा - कर्जत जेलमधून पळालेले आरोपी सापडले
प्लॅस्टिक बंदी संदर्भात मार्गदर्शन
कारवाईसाठी गेलेल्या पथकात स्वच्छता निरीक्षक पी.एस. बीडकर, तुकाराम भांगरे, राज सामल, सुरेश वाघ, बाळासाहेब विधाते, अविनाश हंस, मुकादम किरण नागापुरे आदींचा समावेश होता. दंडात्मक कारवाईनंतर या दुकानदारांना प्लॅस्टिक बंदी संदर्भात मार्गदर्शनही करण्यात आले.
मार्चपासून प्लॅस्टिकमुक्ती मोहीम
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला प्लॅस्टिक मुक्ती मोहीम राबविण्यासाठी कृतिआराखडा तयार करण्याच्या सूचना नुकत्याच दिल्या होत्या. त्यानुसार कृतिआराखडा तयार करून नगर शहरात मार्च महिन्यात प्लॅस्टिक मुक्तीची मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एकत्रितपणे ही कारवाई करणार आहे. शहरातील प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.