बैलगाड्यावर पोसलिसांची कारवाई

राजकुमार शहा 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मोहोळ : सोलापुर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाच साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुक करणाऱ्या 103 बैलगाडी चालकावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बैलांना त्रास देण्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले असून, ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विषेश पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या दहा सदस्यीय पथकाने केल्याची माहिती पथक प्रमुख सुनील हवालदार यांनी दिली.

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार सध्या जिल्हयात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरदार सुरू आहे. साखर कारखान्यांना गाळपासाठी बैलगाडीद्वारे ऊस वाहतुक केली जाते. मात्र ज्या बैलाद्वारे ऊस वाहतुक केली जाते. त्या बैलांच्या गाडीत क्षमतेपेक्षा अतिरीक्त जादा ऊस भरणे, बैलांना विश्रांती न देणे, भर उन्हात त्यांना काम करण्यास भाग पाडणे, बैलांच्या नाकात अतिरीक्त वेसन घालणे, लोखंडी भिंगरीद्वारे त्यांच्या गळ्याला इजा होणे, आदी कारणासाठी दहा सदस्यीय पथकाद्वारे ऊस वाहतुक होणाऱ्या रस्त्यावर कारवाई केली जात आहे.

ही कारवाई 7 डिसेंबर पासुन सुरू करण्यात आली असुन ती 16 डिसेंबर पर्यंत  सुरू राहणार असल्याचे पथक प्रमुख सुनील हवालदार यांनी सांगीतले .पथकात पोलीस नाईक संतोष चव्हाण, बजरंग माने, माहिला पोलीस नाईक कविता घाडगे, प्रियंका आखाडे, हवालदार संजय बिराजदार, सुनील जतकर, खतीब सय्यद, चंद्रकात बिराजदार आदींचा समावेश आहे. 

पोलीस ठाणे निहाय गुन्हे दाखल झालेले बैलगाडी चालक पुढील प्रमाणे 
मंगळवेढा पोलीस ठाणे -23 ,कामती - 25 , सोलापुर तालुका -21 , मोहोळ - 17 ,मंद्रुप - 17 ही कारवाई संत दामाजी ,जकराया शुगर , सिद्वनाथ शुगर ,लोकमंगल शुगर या कारखान्याना ऊस वाहतुक करणाऱ्या बैलगाडी चालकावर करण्यात आली आहे.

मुक्या जनावराना त्रास देणे हे कायद्याने गुन्हा आहे.पशु आपणाला पैसे मिळवुन देतो त्यांची काळजी घेतली पाहिजे.
- सुनील हवालदार (पथक प्रमुख)

Web Title: action on bullock cart in mohol