प्रेशर हॉर्न..फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

सांगली - सांगली वाहतूक नियंत्रण शाखेच्या कारवाईच्या धडाक्‍याने वाहनधारकांना थोडीफार शिस्त येऊ लागली आहे. मोटार वाहन कायद्यातील नियमांचा भंग केल्यास सुधारित दंडानुसार कारवाई केली जात आहे. प्रेशर हॉर्नचा कर्णकर्कश्‍श आवाज आणि फॅन्सी नंबरप्लेट, ट्रिपल सीट कारवाईवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. 

वाहतूक नियंत्रण शाखेने सुधारित दंडानुसार जानेवारी महिन्यात 5200 जणांवर कारवाई केली. फेब्रुवारी महिन्यात हे प्रमाण चार हजारांच्या खाली आहे. त्यामुळे "दंडाचा बडगा नको रे बाबा' म्हणत वाहनधारक लायसन्स आणि कागदपत्रे जवळ बाळगत आहेत. वाहतूक पोलिसाने पकडले की फोन जोडून दबाव आणणारे हुल्लडबाज तरुणही आता नरमले आहेत. कारण मध्यस्थाचा फोन आणि दबाव न स्वीकारण्याचे कडक धोरण पोलिसांनी अवलंबले आहे. सहायक निरीक्षक अतुल निकम यांनी त्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 

सुधारित दंड पूर्वी कमीत कमी शंभर रुपये होता. परंतु आता कमीत कमी 200 रुपये दंड आहे. फॅन्सी नंबरप्लेट आणि प्रेशर हॉर्नसाठी एक हजार रुपये दंड आकारला जातो. ट्रिपल सीटसाठी देखील हजार रुपयांपर्यंत दंड केला जातो. या तिन्ही प्रकारावर पोलिसांनी लक्ष केंद्रित करून कारवाई सुरू केली आहे. दंडात्मक कारवाईचा उच्चांक गाठणे हे वाहतूक पोलिसांचे उद्दिष्ट नसून वाहनधारकांमध्ये शिस्त यावी, हाच उद्देश आहे. 

Web Title: Action on the Fancy number plate

टॅग्स