दुकानदारांच्या अतिक्रमणांवर हातोडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - महापालिकेने शिवाजी मार्केट आणि पापाची तिकटी ते माळकर तिकटी येथे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली. दुकानाचे फलक, छपऱ्या व मटेरियल यांची अतिक्रमणे हटविली. आज दिवसभर ही कारवाई सुरू होती. 

शिवाजी मार्केटमध्ये दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली होती. येथून चालणेही कठीण बनले होते. प्रत्येक दुकानदार आपले साहित्य दुकानाच्या बाहेरही लावत होता. त्यामुळे ये-जा करणे कठीण होत चालल्याने आज ही कारवाई केली. 

शिवाजी मार्केट इमारत व परिसरात बी. जी. महाजन, सादुले सोळंकी, जांगनुरी, नगारे, रामचंद्र मूग, विभुते, विनायक स्टोअर्स, श्रीकृष्ण स्टोअर्स, शिवकृपा स्टोअर्स, सादुल विद्याधर नगारे, सावर्डेकर, एस. एम. दिलीप जनरल स्टोअर्स, चैतन्य ब्रदर्स, श्रेया भडंग, बालाजी क्‍लॉथ, लक्ष्मी नारायण एजन्सी, बी. के. मांगलेकर, जितेंद्र मेटल्स, पापाची तिकटी, राजश्री सिझबेबल, राज स्टोअर्स, सविता कटलरी, शनी मंदिर, शिंपी समाज इमारत, महापालिका चौक, माळकर फरसाण मार्ट, हॉटेल जयहिंद, लुगडी ओळ त्याचबरोबर पापाची तिकटी परिसरातील विशाल होजिअरी, भोरे नॉव्हेल्टी, जयभवानी, डेक्कन टी, मुश्‍ताक अगरबत्ती, जयभारत टी. डेपो, ईस्माईल तांबोळी स्टोअर्स, बर्थडे टी. डेपो, मुन्ना पतंग डेपो, राजू पतंग डेपो, कृष्णा मोबाइल, आनंद फेम, रजपूत फेम, मुरारी होजिअरी, जी. जी. भोसले, विजय ट्रेडिंग, लक्ष्मी क्‍लॉथ, शिव मेन्सवेअर, उरुणकर फरसाण, राम गारमेंट येथे कारवाई झाली. 

सहायक आयुक्त सचिन खाडे, एस. के. माने, राजेंद्र वेल्हाळ, रमेश कांबळे, विनोद पांचाळ, अतिक्रमण पथक प्रमुख पंडित पोवार, मिलिंद कारेकर, शरद माने यांच्यासह 30 हून अधिक कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते. 

Web Title: action on howkers