मोहोळ तालुका पंचायत समितीत कारवाईची तलवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

सभेच्या सुरवातीलाच पं. स. कक्ष अधिकारी राजेंद्र वारगड यांचे काम चांगले असून त्यांच्या वर झालेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी अशी मागणी उपस्थित सर्व सदस्यांनी केली.

मोहोळ - मोहोळ तालुका पंचायत समितीचे कक्ष अधिकारी आर. बी. वारगड यांचेवर बैठकीला गैरहजर राहील्याबद्दल केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी सहानुभूती पंचायत समिती सभागृहाच्या मासिक बैठकीत घेतली तर दुसरीकडे सातत्याने गैरहजर राहणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ.  पाथरुडकर यांचेवर कार्यवाही करण्याचा ठराव पंचायत समितीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती समता गावडे होत्या. यावेळी उपसभापती साधना देशमुख, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, सहाय्यक गटविकास अधिकारी रतीलाल साळुंखे, गटनेते अशोक सरवदे, पं. स. सदस्य अजिंक्यरणा पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, रामराजे कदम, प्रतिभा व्यवहारे, सुनीता भोसले, सिंधुताई वाघमारे, रत्नमाला पोतदार आदींसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. 

सभेच्या सुरवातीलाच पं. स. कक्ष अधिकारी राजेंद्र वारगड यांचे काम चांगले असून त्यांच्या वर झालेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी अशी मागणी उपस्थित सर्व सदस्यांनी केली. याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी नव्यानेच आलेले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पथरुटकर हे सातत्याने गैरहजर राहतात. त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्या केंद्रावर परिणाम झाला असून त्यांच्या वर तातडीने वरिष्ठांकडून कारवाई करण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. त्याच बरोबर सिना नदीवरील पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याचे दरवाजे पूर्णपणे काढू नयेत असा ठराव घेण्यात आला. दुधाला 30/- रुपये पेक्षा जादा दर देण्यात यावा, रमजान महिन्यात भारनियम  करण्यात येऊ नये, याच बरोबर तालुक्यामध्ये आयएसओ मानांकन झालेल्या 27 अंगांवाड्याना  भेटी देऊन त्यांना प्रमाण पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा असे बैठकीत ठराव करण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्या 50 लाख रुपये सेस चे वितरण सर्व सदस्याना समान वितरीत करण्यात आल्याचे गटनेता अशोक सरवदे यांनी सांगितले. 

बैठकीला गैर असणारे वैधकीय अधिकारी यांच्यावर कारवाई व कक्ष अधिकारी वारगड यांच्या बाबतीतले सभागृहाच्या भावना जिल्हा परिषद प्रशासनाला कळविणार आहे. - अजिंक्य येळे (गटविकास अधिकारी मोहोळ)

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Action on ineligible officers in Mohol Taluka Panchayat Samiti was taken