कोल्हापूरातील हेरिटेज इमारतीचे जतन आणि संवर्धनासाठी कृती आराखडा हवा 

Action Plan Should Be Taken For The Preservation And Conservation Of Heritage Buildings In Kolhapur
Action Plan Should Be Taken For The Preservation And Conservation Of Heritage Buildings In Kolhapur

कोल्हापूर - शहरातील हेरिटेज इमारतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्याला सरकारी निधीची गरज आहे. त्याचबरोबर शहरात 150 अशा इमारती असल्या तरी नोंदणी मात्र 74 ठिकाणाचीच आहे. या सर्व स्थळांची नोंदणी करुन त्याच्या जतन आणि संवर्धनासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. हेरिटेज सप्ताहाच्या निमित्ताने या सर्व विषयांची चर्चा सुरु झाली आहे.मात्र प्रशासकीय पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. या सर्व वास्तुंचा दर्जा हा अतिशय उत्कृष्ट आहे. कांही स्थळे हे तर राष्ट्रीय पातळीवर त्याची नोंद घ्यावी,अशा दर्जाची आहेत. 

हेरिटज इमारतीचे वर्गीकरण जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अशा तीन स्तरावर यांची विभागणी करण्यात येत असते. मात्र, राज्य शासन अथवा केंद्र शासनाकडून योग्य त्या प्रमाणात या इमारतींची अथवा स्थळांची देखभाल केली जात नाही. त्यामुळे या इमारतीचे मूळ स्वरुपात जतन आणि संवर्धन करणे हेच एक महत्वाचे आहे. हेरिटेज सप्ताहाच्य निमित्ताने जिल्हा प्रशासन, महापालिका विविध कार्यक्रम घेवून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. 
हेरिटेज संवर्धन समितीच्या पुढाकाराने या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पण या इमारतींच्या जतन आणि संवर्धनासाठीही ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. केंद्र, राज्य शासनाने यासाठी ठोस कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी यानिमित्ताने होत आहे. 

कोल्हापूर शहरातील शाहू मिल, टेंबलाई, चित्रदुर्ग मठ, कोटीतीर्थ, रंकाळा टॉवर, जैन मठ, बाबूजमाल दर्गा, महावीर कॉलेज, सीपीआर हॉस्पीटलची इमारत, पुराभिलेखागार, खासबाग मैदान, पाण्याचा खजिना, राधाकृष्ण मंदिर, आर्यर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल, महापालिका इमारत, एमएलजी, साठमारी, बिंदू चौक तटबंदी अशी अनेक ठिकाणे दुर्लक्षितच आहेत. या ठिकाणाच्या मूळ स्वरुप टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. त्याचबरोबर या ठिकाणांवर विद्युत प्रकाशझोत गरजेचे आहे. 

माहिती फलक लावावेत... 

ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक आहेत. पर्यटकांना या ठिकाणांची माहिती व्हावी, यासाठी प्रयेक इमारतीसमोर त्याची माहिती असणारा फलक लावणे गरजेचे आहे. त्यात इमारतीची माहिती, ऐतिहासिक महत्व, स्थापनेचा उल्लेख असावा, असे झाले तर पर्यटकांना सहजपणे याठिकाणाची माहिती बरोबरच महत्त्वही समजेल. 

सरकारी आणि खासगीही मालकी 

शहरातील हेरिटेज इमारतीची मालकी सरकारी, संस्था आणि खासगी व्यक्तींकडेही आहे. यापैकी मुख्य सरकारी इमारतीतील कार्यालये वगळता अनेक इमारतीची स्थिती फारशी चांगली नाही. त्याकडे लक्ष द्यायला हवे. 

शाहू मिल हे हेरिटेज यादीतील एक महत्वाचे ठिकाण असून ही मिल बंद पडल्यापासून इमारत आणि जागेची दुरवस्थाच झाली आहे. त्यामुळे या इमारतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी योग्य ती पावले शासनाने उचलायला हवीत. 
- अमरजा निंबाळकर, अध्यक्षा, हेरिटज वारसा जतन आणि सवंर्धन समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com