तर पार्लरच्या जागा मालकावरही कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

कोल्हापूर - मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना चालविला जात असेल तर संबधितांबरोबर आता जागा मालकावरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी आज "सकाळ' शी बोलताना स्पष्ट केले. शहरातील सर्वच मसाज पार्लरची तपासणी करा. ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करा, असे आदेश शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. 

शहरातील भरवस्तीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाने चालविले जात आहेत. अशा तीन कुंटणखान्यावर शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्या पथकांने कारवाई केली. मोबाईल क्रमांकाचा अगर जाहीरात देऊन ग्राहक शोधून हे कुंटणखाने चालवले जात असल्याचे तपासात पुढे आले आहे. जिल्ह्यातील तसचे परप्रांतीय महिलांचा त्यासाठी वापर केला जात आहे. अवैध व्यवसाय मोडून काढले पाहीजेत. तसेच येथून पुढे असे व्यवसाय करण्याचे धाडस पुन्हा कोणी करता कामा नये, अशा पद्धतीची मोहीम राबविण्याचे आदेश शहर पोलिस उपअधीक्षक राणे यांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. 

हद्दीत सुरू असणाऱ्या प्रत्येक मसाज पार्लरची तपासणी करा. त्याच्या नोंदणीच्या कागदपत्रासह नेमके पार्लरमध्ये काय चालते, याची माहिती घेऊन अवैध अगर संशयास्पद वाटणाऱ्या पार्लरवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

अवैध व्यवसायासाठी जागा देणारा मालकही तितकाच दोषी आहे. त्याच्यावरही कारवाई करा. आवश्‍यक त्या ठिकाणी स्वतंत्र पथकाची नेमणूक करा, अशा कडक सूचना राणे यांनी दिल्या आहेत. 

अवैध व्यवसायासाठी जागा भाड्याने दिल्यास जागा मालकही कारवाईस पात्र ठरतो. त्यामुळे जागा मालकाने दक्ष रहावे. मजास पार्लरच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असतील तर जागृक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करावी. त्यांचे नाव गोपनीय ठेऊन प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाईल. 
भारतकुमार राणे (शहर पोलिस उपअधीक्षक)

Web Title: Action on the property owner