संविधानाची प्रत जाळणाऱ्याविरोधात कारवाई करावी : बारसकर

राजकुमार शहा 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मोहोळ : भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी एका निवेदनाव्दारे मोहोळ पोलिसांकडे केली आहे 

गुरुवारी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हे कृत्य बेकायदेशीर असून, यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना कडक शासन करावे, अशी मागणी केली आहे.

यावेळी क्रांती ज्योती परिषदेचे प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षीरसागर, उमेश कांबळे, आप्पा बनसोडे, सचिन सुरवसे, धिरज कांबळे, सुशांत बनसोडे, लक्ष्मण करे, सुशांत शिवशरण, आकीब मुजावर उपस्थित होते 

Web Title: Action should be taken against those who burn the copy of the Constitution says Baraskar