राष्ट्रवादीच्या 'या' 18 नगरसेवकांवर झाली कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज महानगरपालिकेत भाजपला महापौर निवडणुकीत मतदान करणाऱ्या अठरा नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ तर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पदावरुन हटवले.
 

अहमदनगर- प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज महानगरपालिकेत भाजपला महापौर निवडणुकीत मतदान करणाऱ्या अठरा नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ तर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पदावरुन हटवले.

या कारवाईबाबत बोलताना अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पक्ष कुणालाही माफ करणार नाही पक्षाने ही बाब गंभीर घेतले असल्याने 18 नगरसेवक आणि शहर जिल्हाध्यक्ष यांच्यासह हा निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या कर्ता करवित्यावरही कठोर कारवाई करेल, टप्याटप्याने ही कारवाई जरूर भविष्यात होईल असे स्पष्ट केले आहे.

भाजपला साथ देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची हकालपट्टी

आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता त्यांनी हे स्पष्टीकरण केले.  नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष यांना आपला लेखी खुलासा देणे अपेक्षित होते, या खुलशात त्यांच्या निर्णयाला कोण जबाबदार आहे ही बाब समोर आली असती, मात्र सात दिवसांची आणि वर दोन दिवसांची वाढीव मुदत देऊनही खुलासा प्रदेशाध्यक्षा कडे पोहचला  नसल्याने पक्षाकडून नगरसेवकांसह शहर जिल्हाध्यक्ष यांच्यावर  कारवाई केली असल्याचे मत फाळके यांनी व्यक्त केले. आमदार संग्राम जगताप यांच्यावर कारवाई पक्षाकडून अपेक्षित होती का या प्रश्नावर त्यांनी पक्ष या बाबतीत गंभीर असून भविष्यामध्ये कठोरपणे निर्णय घेऊन या गोष्टीच जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीच्या या नागरसेवकांवर झाली कारवाई..
1) सागर बोरुडे
2) मीनाक्षी चव्हाण
3) दीपाली बारस्कर
4) संपत बारस्कार
5) विनीत पाउलबुद्धे
6) सुनील त्रंबके
7) खान समद वहाब
8) ज्याती गाडे
9) शोभा बोरकर
10) कुमार वाकळे
11) रुपाली पारगे
12) अविनाश घुले
13) गणेश भोसले
14) परवीन कुरेशी
15) शेख नजीर अहमद
16) प्रकाश भागानगरे
17)शीतल जगताप
18)मीना चोपडा

Web Title: Action taken against NCPs 18 corporators in nagar