"कार्यकर्ता स्वच्छ चारित्र्याचा हवा' - अण्णा हजारे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

राळेगणसिद्धी - 'कार्यकर्ता ध्येयवादी, निःस्वार्थ व स्वच्छ चारित्र्य असलेला पाहिजे. त्याने राजकीय पदाकडे आकर्षित न होता व कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता सतत काम केले पाहिजे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. पुण्यातील आशिया मानवशक्ती विकास संस्था, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, भोसरीतील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे आयोजित सामाजिक कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते. हजारे म्हणाले, 'कार्यकर्ता ध्येयवादी असला पाहिजे. प्रश्नाच्या तळाशी जाऊन त्याने अभ्यास केला पाहिजे. त्याचे आचार, विचार शुद्ध, चारित्र्य निष्कलंक आणि त्यागाची वृत्ती असली पाहिजे. त्याच्या शब्दाला कृतीची जोड असावी.''

Web Title: activist clean Character anna hazare