श्रमदानासाठी आष्टी तालुक्यात येणार सिनेअभिनेते अमीर खान

अनिरुद्ध धर्माधिकारी
बुधवार, 11 एप्रिल 2018

आष्टी (नगर) : ग्रामीण आणि दुष्काळी भागातील गावात पाणी फाऊंडेशनचे काम सध्या मोठय़ा प्रमाणावर सुरू असून येथील 113 गावांसह  654 लोकांनी प्रशिक्षण घेतले असुन असेच जोमाने काम करा दुष्काळावर मात करण्यासाठी एकीची वज्रमुठ बनावा मी तालुक्यातील काम पाहुन आनंदित झालो असून पुढील महिन्यात श्रमदानासाठी येणार असल्याचे प्रतिपादन पाणी फाऊंडेशनचे प्रमुख तथा सिनेअभिनेते अमीर खान यांनी केले.

पाथर्डी (जि. नगर) येथे भेट दिल्यानंतर आमीर खान हे आष्टी येथे मंगळवारी (ता. १०) रात्री तहसील कार्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले होते. आज (बुधवार) सकाळी त्यांनी तहसीलदार रामेश्वर गोरे यांची भेट घेवून पाणी फाऊंडेशनच्या सुरू असलेल्या कामाविषयी माहिती घेतली.
पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपण सर्वाच्या सहकार्यानी पाणी फाऊंडेशन ही सामाजिक चळवळ सुरू केली असून त्यात जास्तीत जास्त गावांनी सहभाग नोंदवून बक्षीसपात्र व्हावे, यासाठी ग्रामस्थांनी एकिचे बळ निर्माण करणे काळाची गरज असल्याचे मत आमीर खान यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील सुरू असलेल्या कामाची माहिती घेऊन समाधान व्यक्त करीत पुढील महिन्यात मी स्वत: श्रमदानासाठी आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित आष्टीकरांना दिले व पुढील कार्यक्रमासाठी ते पाथर्डीकडे रवाना झाले.

Web Title: actor amir khan will be seen in ashti taluka pani foundation