धनगर आरक्षणासाठी १३ आॅगस्टला धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

इस्लामपूर - भारतीय राज्यघटनेतील अनुसूचित जमातीच्या सवलती धनगर समाजाला लागू कराव्यात या मागणीसाठी येत्या १३ तारखेला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्ह्यांच्या ठिकाणी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी नगराध्यक्ष आणि धनगर समाजाचे नेते अॅड. चिमण डांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

इस्लामपूर - भारतीय राज्यघटनेतील अनुसूचित जमातीच्या सवलती धनगर समाजाला लागू कराव्यात या मागणीसाठी येत्या १३ तारखेला महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असे माजी नगराध्यक्ष आणि धनगर समाजाचे नेते अॅड. चिमण डांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हक्काच्या मागणीसाठी असलेला हा लढा यापुढे धनगर समाजातील सर्व नेते, कार्यकर्ते एकत्र येऊन लढणार आहेत, असेही श्री. डांगे म्हणाले. डांगे म्हणाले, "डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत अनुसूचित जमातीला ज्या सवलती नमूद केल्या आहेत, त्या धनगर समाजालाही लागू होतात. मात्र ड आणि र या शब्दांतील घोळामुळे तांत्रिक अडचण सांगून केंद्र आणि राज्य सरकारने आजतागायत या सवलती दिल्या नाहीत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी बारामती येथील सभेत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी भाजपचे सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र चार वर्षे झाली तरी हे आश्वासन पाळले नाही. भुलवणे आणि थापा मारण्याचा उद्योग केल्याने धनगर समाजात प्रचंड रोष आहे. अस्वस्थता आहे.

- अॅड. चिमण डांगे

पुणे व चौंडी येथे समाजातील प्रमुख नेत्यांच्या बैठका झाल्या यात समाजासाठी पक्ष, संघटना, झेंडे बाजूला ठेवून एकत्र येऊन हा लढा अखेरपर्यंत तीव्र करण्याचा निर्णय झाला आहे. येत्या १३ तारखेला राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११ वाजता शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन होईल, असेही श्री. डांगे यांनी सांगितले 

या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार प्रकाश शेंडगे करतील. समाजाला सवलती लागू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले जाईल. शासनाने लवकरात लवकर सवलती लागू कराव्यात यासाठी हे आंदोलन इशारा असेल, असेही श्री डांगे म्हणाले

Web Title: Ad Chiman Dange Press