भगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय

भगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय

वाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा नये. कष्टकरी शोषितांसाठीचा लढा अजूनही संपलेला नाही असे मत भगतसिंह यांचे पुतणे सहारणपुरचे अॅड. सरदार किरणजीत सिंह यांनी व्यक्त केले.

येथे क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने ते आज येथे आले होते. श्री. किरणजीतसिंह म्हणाले,"" फाळणी देशाचे दुर्भाग्य होते. पंजाबने फाळणीच्या झळा खूप खोलवर सोसल्या आहेत. सध्या देशात शहीद भगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र ते जाती धर्मापलीकडे गेले होते. ते प्रखर राष्ट्राभिमानी होते. त्यांच्या स्वप्नातील भारत भेदभाव विरहित, आर्थिक संपन्न असा होता. त्यांचे हे स्वप्न पुर्ण करणे सर्वांचे ध्येय्य हवे. त्यांच्यावर रशियन क्रांतीच्या प्रभाव होता. मानवतावादी समाज निर्मितीचे ते पुरस्कर्ते होते. आज देशभरात सध्या विपरीत परिस्थिती आहे. 2004 मध्ये मी शहीद भगतसिंह यांच्या बलिदान दिन कार्यक्रमासाठी पाकिस्तानात लाहोरला गेलो होतो. दोन दिवसात मला पाकिस्तानी जनतेच्या मनातील भावना जाणून घेता आल्या. भगतसिंग इस पास और उस पार अभीभी जिंदा हैं.... सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेच्य मनात भगतसिंह आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याबाबतच्या भावना आदराच्या आहेत. मात्र पाकिस्तानी लष्कर आणि जम्मू काश्‍मिर मधील लष्कर पुरस्कृत दहशतवादी दुही माजवत आहेत. त्या आश्रयदात्यांना वेचून मारले पाहिजे. त्याच्या संपुर्ण नायनाट केला तर दोन्ही देशातील सामान्य जनता एकत्र येईल. '' 

ते म्हणाले,"" सगळे राजकीय पक्ष एकच आहेत. त्यांच्या धोरणात्मक फरक नाही. गरीबांचे शोषण सुरू आहे. त्यांचे जगणे अवघड आहे. गरीबांचे जगणे अवघड झाले आहे. राजकीय पक्ष सामान्यांचे शोषण करीत आहेत. देशात पैशाचे राजकारण सुरू आहे. ते फार घातक आहे. या स्थितीत देशाभिमान, देश निष्ठेवरच प्रश्‍न उपस्थित होत आहेत. नागनाथअण्णांसारखी अनेकांना सत्तेत जाऊन समाज बदलाची संधी मिळाली नाही. शोषणमुक्त समाज निर्मिती हे आजही आव्हान आहे. तसे झाले तरच देशाची प्रगती होईल. अन्यथा सबका साथ... सबका विकास हे थोतांड ठरेल.'' 

...इथली प्रगती सहकारातून 

महाराष्ट्राबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना अॅड किरणजीतसिंह म्हणाले,"" यापुर्वी मी वडीलांसोबत सांगली सोलापुर परिसरात आलो होतो. ही भुमी स्वातंत्र्य लढा त्यागाचा वारसा सांगणारी आहे. या भागात सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकास झाला आहे. त्या तुलनेत पंजाब व लगतच्या भागात सहकार कमी रूजला आहे. ''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com