आघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

गडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आधीच आघाडी केली आहे. आता इतरांना ते विचारत आहेत. परंतु त्यांनी जनता दलाला गृहीत धरू नये, असा इशारा जनता दलाचे नेते अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी आज येथे दिला. 

गडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आधीच आघाडी केली आहे. आता इतरांना ते विचारत आहेत. परंतु त्यांनी जनता दलाला गृहीत धरू नये, असा इशारा जनता दलाचे नेते अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी आज येथे दिला. 

जनता दल कार्यकर्त्यांच्या बैठकीत अॅड. शिंदे यांनी आज आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाची भूमिका जाहीर केली. ते म्हणाले, ""या गठबंधनमध्ये सर्वच छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांना सामावून घेण्यात येणार आहे. या गठबंधनचे काय होणार आहे, हे ज्या-त्या वेळी समजेलच. प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारानेही वंचितांची आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झालीच असे सांगताहेत. त्यानंतर त्यांनी इतर पक्षांचा विचार करीत आहेत. आता जनता दलाला जमणार नाही. त्यांची आघाडी होवू दे. भाजप आणि कॉंग्रेस आघाडीने तरी कुठे दिवे लावले आहेत. दोन्ही आघाड्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी जनता दलाचा कोणताच संबंध नाही. यामुळे त्यांनी आम्हाला गृहीत धरू नये."" 

 आम्ही कोणाचे गुलाम नाही 
श्री. शिंदे म्हणाले, ""जनता दल हा पक्ष निखळ समाजवाद आणि गोरगरीबांच्या कल्याणावर उभारलेला आहे. तो एक स्वतंत्र अस्तित्व ठेवून कार्यरत राहिलेला पक्ष आहे. यामुळे जनता दल कोणाचा गुलाम नाही. जनता दलाची भूमिकाही वरिष्ठ पातळीवरूनच जाहीर होईल. आम्हीही तीच भूमिका मान्य करू."" 

ते म्हणाले, ""गडहिंग्लजची हद्दवाढ झाली पाहिजे. त्यामध्ये हट्टीबसवाणा व करडे वसाहत समाविष्टची गरज आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते, नगरपालिका व कृती समितीने लढा उभारला आहे. आता मात्र या प्रश्‍नी काही नेत्यांमध्येच डिजीटलची स्पर्धा लागली आहे. लढणारे मात्र बाजूलाच आहेत. ही स्पर्धा लढाऊ लोकांना अपमानित करणारी आहे."" 

उस्मानबादला पक्षाची परिषद 
शिंदे म्हणाले, ""27 व 28 ऑक्‍टोबरला उस्मानाबाद येथे जनता दलाची परिषद होणार आहे. यावेळी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, राष्ट्रीय सचिव दानीश अली यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबरच माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांची विशेष उपस्थिती आहे. या परिषदेत आगामी निवडणुकीसाठी पक्षाचे धोरण जाहीर होईल. 

Web Title: Ad Shripatrao Shinde comment

टॅग्स