पंढरपूर यात्रेसाठी जादा रेल्वेगाड्यांचे नियोजन

पंढरपूर यात्रेसाठी जादा रेल्वेगाड्यांचे नियोजन

मिरज - पंढरपुरच्या आषाढी यात्रेसाठी रेल्वेच्या सोलापूर विभागाने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार मिरज ते पंढरपूर आणि मिरज ते कुर्डुवाडी या मार्गावर जादा गाड्या धावणार आहेत.

मिरज-पंढरपूर ( गाडी क्रमांक 01453 ) पॅसेंजर मिरजेतून पहाटे 5.30 वाजता सुटेल. दुपारी 12.20 वाजता परत येईल. हीच गाडी मिरज-कुर्डुवाडी म्हणून ( क्रमांक 01491 ) दुपारी 2.20 वाजता निघेल. रात्री पावणेबारा वाजता मिरजेत परतेल. रात्रभर थांबून पुन्हा पहाटे साडेपाच वाजता पंढरपूरला निघेल. या गाडीला आठ डबे आहेत. पंढरपूर यात्रा 12 जुलैरोजी आहे. जादा गाड्या 7 ते 16 जुलै या कालावधी धावतील.

याशिवाय पंढपूरला जाण्यासाठी मिरजेतून कुर्डुवाडी ( पहाटे 6 ), सोलापूर एक्सप्रेस ( दुपारी 4 ), पंढरपूर सुपरफास्ट ( संध्याकाळी 6.20 ) परळी पॅसेंजर ( रात्री 8.30 ), कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस ( रात्री 1.20 ) या गाड्याही आहेत. कोल्हापूर नागपूर ही साप्ताहीक एक्सप्रेसदेखील सोमवारी मिरजेतून आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com