
राष्ट्रीय शालेय डायव्हिंग स्पर्धा : बिल्वाला दोन तर ईशाला 1 सुवर्ण, रौप्य
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत बिल्वा हिने तीन मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात 260.05 गुण घेऊन राष्ट्रीय स्पर्धेतील नवा विक्रम प्रस्थापित करत सुवर्ण पदक पटकाविले. तिने एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारातही 274.10 गुण घेऊन दुसरे सुवर्ण पदक पटकाविले. यापूर्वी बिल्वाने 17 वर्षाखालील मुलींच्या गटातही नवा विक्रम केला होता. ईशा हिने हायबोर्ड या प्रकारात 247.85 गुण घेऊन सुवर्ण पदकासह नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. तसेच, तिने तीन मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारातही रौप्य पदकाची कमाई केली आहे.
सोलापूर : सिंगापूर येथे होणाऱ्या फिना डायव्हिंग ग्रॅंड प्रिक्स स्पर्धेसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील आदित्य गिरामची भारतीय संघात निवड झाली आहे.
वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आदित्यने सुवर्णपदक
स्पर्धा सिंगापूर येथे उद्यापासून (शुक्रवार) सुरू होत आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात तिकीट तपासणीस म्हणून कार्यरत असलेल्या आदित्य गिराम याची भारतीय संघात निवड झाली आहे. नुकत्याच इंदूर येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आदित्यने सुवर्णपदक पटकाविले आहे. भारतातून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी संघ पाठवला जात असून आदित्य गिरामची यासाठी निवड करण्यात आली. त्यास आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि मध्य रेल्वेचे प्रशिक्षक हरीश अन्नलदास यांचे मार्गदर्शन लाभले. मध्य रेल्वेच्या सोलापूरचे विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता, अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक व्ही. के. नागर, राज हिरडे, एन. ए. देशमुख यांनी अभिनंदन केले.
पीवायसीवर उद्यापासून प्रकाशझोतात टेन पासेसची रंगत
ईशा वाघमोडे, बिल्वा गिराम यांना नवीन विक्रमासह सुवर्ण
शालेय राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत येथील ईशा वाघमोडे हिने 17 वर्षाखालील मुलींच्या गटात तर बिल्वा गिराम हिने 19 वर्षाखालील मुलींच्या गटात नवीन विक्रम प्रस्थापित केला. ईशा ही हिराचंद नेमचंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची तर बिल्वा ही ए. डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिंनी आहे.