पुरग्रस्त भागातील धोरणात्मक बाबींसाठी शासनाकडे शिवसेना करणार पाठपुरावा

पुरग्रस्त भागातील धोरणात्मक बाबींसाठी शासनाकडे शिवसेना करणार पाठपुरावा

कोल्हापूर - पुरग्रस्त भागातील शेतकऱ्याचे किंवा व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान असेल ते भरून देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे.  तसेच पडझड झालेल्या किंवा धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे अशा धोरणात्मक बाबींसाठी शासनाकडे शिवसेना सतत पाठपुरावा करत राहतील. पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी शिवसेना आपली ताकद पणाला लावेल, अशी ग्वाही शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिले.

आमदार राजेश क्षीरसागर व शिवसेना यांच्यावतीने पूरग्रस्तांना शिवसेना सहाय्य या उपक्रमाद्वारे जीवनावश्यक वस्तूंची मदत बापट कॅम्प परिसरातील देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बापट कॅम्प परिसरातील कुंभार बांधवांच्यावतीने माजी महापौर मारुती कातवरे यांनी पूरग्रस्तांचे प्रश्न श्री. ठाकरे यांच्या समोर मांडले. 

श्री. कातवरे म्हणाले, पुरामुळे आमचे प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले, तसेच गणेश मुर्ती पाण्यात वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात व्यावसायिक नुकसानही झाले आहे. आम्ही आता पूर्ण संपलो आहोत. आमच्यापैकी अनेकांनी हंगामी कर्ज घेतली होती. या कर्जाचे संकट मूर्तिकारांचे समोर आहे. अशा स्थितीत कर्जमाफी बरोबरच आम्हाला आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा आहे.  

श्री. ठाकरे म्हणाले की, पुराच्या संकटाला आपण सगळे धीराने सामोरे गेलात आपला जीव वाचवणे हे महत्त्वाचे होते. अशावेळी माणूसपण जागे ठेवून सर्वजण एकमेकांच्या मदतीला आले. तुमचे जीव वाचले आहेत. आपण सर्वजण हिमतीने पुराच्या प्रसंगाला सामोरे गेलात, ही मोठी बाब आहे. त्याला मी दाद देतो. पुराच्या काळात शिवसेनेचे मंत्री कोल्हापुरात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले. सलग आठ दिवस त्यांना इथेच थांबावे लागले. दूर अंतरावर पूर पसरला होता. अनेकांची घरे पुरात होती. अशा काळात शिवसेना मदतीला धावली. ठाणे - कल्याण मुंबईबरोबरच राज्यातील शिवसेनेच्या अन्य शाखाकडून ही मदत कार्य सुरू झाले.  

आमदार क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांची चर्चाही केली आहे. त्यात पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीचे 24 वेगवेगळे मुद्दे दिले आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री लवकरच काही सकारात्मक निर्णय घेतीलच. 

- आदित्य ठाकरे

आमदार राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com