राज ठाकरेंकडून काय धडा घेतला? आदित्य ठाकरे म्हणतात…

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद दौऱ्याला जळगावमधून सुरूवात झाली आहे. मजल-दरमजल करत आज ही यात्रा नगरमध्ये पोहचली.

नगर: नगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात संवादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एका विद्यार्थ्याने आदित्य ठाकरेंना काहीसा गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला. मात्र, आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

राज ठाकरेंकडून तुम्ही राजकारणातला कोणता धडा घेतला? यावर मी राजकारणाचे धडे लोकांकडून घेत असतो किंवा तसा प्रयत्न करतो. मी पहिला धडा घेतलाय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ते मला नेहमी सांगायचे जे काही करणार असशील ते 100 वेळा विचार करून कर एकदा बाण सुटला की परत येत नाही. असं उत्तर देताच उपस्थितांनी एकच जल्लोष करत टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज केला.

पुढे बोलताना आदित्य म्हणाले, दुसरा धडा मी माझे वडील उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतलाय.. जे काही करायचं आहे ते प्रामाणिकपणे करायचं कधी नाटकं करायचं नाही आणि लोकांशी कधी खोटं बोलायचं नाही या दोन गोष्टी घेऊन मी पुढं चाललो आहे.

बाकी लोकांचे आशीर्वाद आणि लोकांकडून शिकायचं असतं आणि तसं पाहायला गेलं तर राजकारण ही काही शिकायची गोष्ट नसते. राजकारणात फक्त धडे घेऊन चालत नाही. तुम्हाला त्याचं गांभीर्य असणे गरजेचे असते. आवडीने केलं तर तुम्हाला कुठलेही धडे घेण्याची गरज नाहीये, असंही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya thackreay Commented on raj thackreay