बिन जुमल्याचं सरकार येऊ दे! - आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

कोल्हापूर - आगामी निवडणुकीत बिन जुमल्याचं सरकार येऊ दे, असे साकडे करवीर निवासिनी श्री अंबाबाईला घातल्याचे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले. राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी शिवसेना, युवा सेना आणि हिंदुत्ववादी संघटनांतर्फे अंबाबाई मंदिरात महाआरती झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘अयोध्येत राम मंदिर उभारलेच पाहिजे. मंदिराच्या विषयाचाही जुमला होऊ नये, यासाठी झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला हवं. शरयू नदीच्या काठी महाआरती केली. त्यानंतर अंबाबाई आणि आता पंढरपूरलाही महाआरती आहे.’’

आगामी वर्ष देशासाठी व महाराष्ट्रासाठीही महत्त्वाचे आहे. देशात सुख-शांती आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा, यासाठीही देवीकडे प्रार्थना केली.
- आदित्य ठाकरे 

संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार राजेश क्षीरसागर, अण्णासाहेब महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हाध्यक्ष विजय देवणे, सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने, संग्रामसिंह कुपेकर, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, रविकिरण इंगवले, शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, माजी स्थायी समिती सभापती सुनील मोदी, देवस्थान समितीच्या खजानीस वैशाली क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर, हर्षल सुर्वे, सुनील शिंत्रे, मंगलताई साळोखे आदी उपस्थित होते. 

दरम्यान, महाआरतीच्या निमित्ताने मंदिर परिसर ‘अंबा माता की जय’, ‘प्रभू रामचंद्र की जय’ अशा घोषणांनी दुमदुमून गेला.

Web Title: Aditya Thakare comment