"बाटू'त सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश 

सिद्धार्थ लाटकर
शनिवार, 28 जुलै 2018

सातारा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने (बाटू) पूर्वीच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना "बाटू'त समाविष्ट करून घेण्याबाबत परिपत्रक काढले आहे. यामुळे सन 2016-17 पासूनच्या शैक्षणिक वर्षापासून "बाटू'अंतर्गत समाविष्ट झालेल्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थ्यांची चिंता दूर झाली आहे. 

सातारा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने (बाटू) पूर्वीच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना "बाटू'त समाविष्ट करून घेण्याबाबत परिपत्रक काढले आहे. यामुळे सन 2016-17 पासूनच्या शैक्षणिक वर्षापासून "बाटू'अंतर्गत समाविष्ट झालेल्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थ्यांची चिंता दूर झाली आहे. 

सन 2017- 18 या शैक्षणिक वर्षात "बाटू'अंतर्गत समाविष्ट झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांतील द्वितीय वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सध्याच्या शैक्षणिक वर्षात सन 2018-19 मध्ये अडचण झाली होती. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच्या विद्यापीठातून परीक्षा दिली आणि अनुत्तीर्ण झाले, अशांना "बाटू'शी संलग्न असलेल्या महाविद्यालयांतून शिक्षण घेता येत नव्हते. त्यांना पूर्वीच्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम "फॉलो' करावा लागत होता. याबाबत "बाटू'ने तोडगा काढावा, अशी अपेक्षा महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांची असल्याचे वृत्त नुकतेच "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते, तसेच विद्यापीठांत पाठपुरावा केला होता. "बाटू'ने पूर्वीच्या विद्यापीठात नोंदणीकृत असलेल्या सन 2016-17 शैक्षणिक वर्षापासूनच्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना सन 2018-19 मध्ये पुनर्प्रवेश देण्याबाबतचा निर्णय घेतला. यामध्ये पूर्वीच्या विद्यापीठातून जे विद्यार्थी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांत उत्तीर्ण झाले आहेत, असे सर्व विद्यार्थी "बाटू'तील द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतील. दरम्यान, संबंधित विद्यार्थ्यांनी "बाटू'च्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाची माहिती ठेवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. "बाटू'च्या परिपत्रकात पूर्वीच्या विद्यापीठातून जे विद्यार्थी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांत तीन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांना "बाटू'मध्ये समाविष्ट करून घ्यावे, तसेच द्वितीय वर्षाला प्रवेश द्यावा. संबंधित विद्यार्थ्यांना "बाटू'च्या अभ्यासक्रमानुसार फेरपरीक्षा द्यावी लागेल याची कल्पना द्यावी. ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षातच प्रवेश हवा असेल त्यांना तो द्यावा, असा पर्याय देखील ठेवण्यात आला आहे. याबरोबरच पूर्वीच्या विद्यापीठातून जे विद्यार्थी अभियांत्रिकीच्या प्रथम अथवा द्वितीय वर्षात अनुतीर्ण झाले आहेत, त्या सर्वांना "बाटू'त समाविष्ट करून त्या- त्या वर्गात प्रवेश द्यावा, असे नमूद करण्यात आले आहे. 

आवश्‍यक कागदपत्रे  
- पूर्वीच्या विद्यापाठीचे ना हरकत प्रमाणपत्र आणि बदली किंवा मायग्रेशन प्रमाणपत्र 
- पूर्वीच्या विद्यापाठीतून बाटूत जाण्याचे कारण 
- संबंधित विद्यार्थ्यांची सीईटीची गुणवत्ता यादी (सन 2016-17, 2017-18) आणि एक प्रत सीईटी प्रवेश पत्राची, सादर केलेली आवश्‍यक कागदपत्रे, ऑनलाईन नोंदणी करतावेळी खात्री केलेली 
कागदपत्रे 
- विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, हजेरीपत्रक 

Web Title: Admission to all students in Dr. Babasaheb Ambedkar University of Technology