दिगंबराच्या गजरात तब्बल 13 वर्षांनी श्रीमुर्ती नृसिंहवाडी गावामध्ये

जितेंद्र आणुजे
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

नूसिहवाडी - येथील दत्त मंदिरातील उत्सव मूर्ती तब्बल 13 वर्षानी आज गावात मुकुंद नरहर हावळे (पुजारी )यांच्या घरी जाण्याचे सुवर्णयोग आला आहे. वासुदेवानंद टेंबे स्वामी यांच्या मठामध्ये कृष्णेचे पाणी आल्याने परंपरेनुसार उत्सव मुर्ती गावात नेण्यात आली. 

नूसिहवाडी - येथील दत्त मंदिरातील उत्सव मूर्ती तब्बल 13 वर्षानी आज गावात मुकुंद नरहर हावळे (पुजारी )यांच्या घरी जाण्याचे सुवर्णयोग आला आहे. वासुदेवानंद टेंबे स्वामी यांच्या मठामध्ये कृष्णेचे पाणी आल्याने परंपरेनुसार उत्सव मुर्ती गावात नेण्यात आली. 

पहाटेच्या मंगलमल वातावरणात दिगंबराच्या गजरामध्ये वासुदेवानंद टेंबे स्वामींच्या मंदिरातून उत्सवमूर्तींना गावातील हावळे यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी सुहासिनीनी जागोजागी औक्षण केले. सकाळी साडेपाच वाजता श्रींची स्वारी महेश पुजारी हावळे त्यांच्या द्वारी मोठ्या भक्तिभावाने नेण्यात आली.

परमपूज्य वासुदेवानंद टेंबे स्वामी स्वामी महाराज यांच्या मठामध्ये आज पहाटे चार वाजता मंदिराच्या उंबऱ्याला पाणी लागले. तत्पूर्वी रात्रभर सर्व ब्रह्मवृंदाने भक्तीभावाने जागता पहारा दिला. मठातून उत्सव मूर्ती प्रयाण करण्यापूर्वी त्या ठिकाणी अनेक ब्रह्मवृंदांच्या साक्षीने पंचोपचार पूजा, काकड आरती करण्यात आली.  हावळे यांच्या घरी आणल्यानंतर तेथे सकाळी पंचोपचार पूजा, लघुरुद्र, पंचामृत अभिषेक, साडेबारा वाजता महापूजा करण्यात आली.

तबबल 51 वर्षांनंतर  हावळे (पुजारी )यांच्या घरी देव आले....

1968 मध्ये कन्यागत पर्व करण्याच्या निमित्ताने श्री हावळे पुजारी यांच्या घरी एकदा देव आले होते. त्यानंतर आज 2019 मध्ये तब्बल 51 वर्षांनंतर पुन्हा त्यांच्या घरी देव येण्याचा हा दुसरा प्रसंग आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after 13 years Shri Datta Murti comes in Narsinghwadi village

टॅग्स