गावविहीरीने अनुभवला 22 वर्षांनी खळखळाट   

धनाजी आसवले
सोमवार, 2 जुलै 2018

सागाव : येथील गावविहिरीतील गाळ तब्बल 22 वर्षानंतर नंतर काढण्यात आला. आता स्वच्छ पाण्याचा झरा वाहू लागला आहे. पाण्याचे पूजन उत्साहात झाले. 1978 मध्ये तत्कालिन सरपंच बाबुराव दादा पाटील व सदस्यांच्या काळात गावविहिर बांधली होती. 1996 च्या दरम्यान विहिरीचे बांधकाम पडले. पुन्हा त्या विहिरीजवळ नविन बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला. तेही पुर्ण झाले नाही. नंतर 12 वर्षापूर्वी जलस्वराज्य योजनेतून सिमेंटची रिंग टाकून विहिरीचा गाळ काढण्याचे काम सुरु केले. युवक व ग्रामस्थानी श्रमदानातून मदत केली. पण काम अपूर्ण राहिले. 

मात्र त्याला यश आले नाही. सरपंच तात्या पाटील, उपसरपंच सत्यजीत पाटील व सदस्यांनी पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी व स्वच्छ पाणी उपलब्ध करण्यासाठी पहिल्यांदा गांव विहिरीतील गाळ काढण्याचे आव्हान स्विकारले. त्यानुसार 45 फुट सिमेंट बांधकामाखाली 22 फुट विहिर खुदाई सुरु केली. पाऊस, खंडीत विज, नदीची पाणी पातळी, मजूरांची टंचाई अशा अडचणींवर मात करीत अखेर काम पूर्ण झाले. संपूर्ण गाळ निघाला. विहिरीने तळ गाठला विहिरीत दोन पारा, एक बोअर त्याकाळी मारले होते.

ते खुले होउन पाणी पातळीत वाढ झाली आहे. धनगरी ढोलाच्या वादनाने पूर्ण गावातून मिरवणूक काढून पाणी पूजन झाले. ग्रामदैवत भैरवनाथाला पाण्याचा अभिषेक घालण्यात आला. सरपंच पाटील, उपसरपंच पाटील, पंचायत समिती सदस्या वैशाली माने, ग्रामपंचायत सदस्य सुशांत पाटील, शिवाजी माने, मनोज पाटील, विलास पाटील, अजित कांबळे, बाबासाहेब परिट, सुभाष पवार, बाळासाहेब चौगुले, लता पाटील, रुपाली पाटील, वैशाली पाटील, अमृता पाटील, सुवर्णा सुतार, प्रियांका पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.   

चुलत्याने विहिर बांधली  पुतण्याने गाळ काढला दिवंगत बाबूराव पाटील सलग 25 वर्षे सरपंच होते. त्यांच्या काळात विहिर झाली. त्यानंतर आतापर्यंत गाळ काढण्याचे काम झाले नव्हते. त्यांचे पुतणे उपसरपंच सत्यजित पाटील सत्तेत आले असताना गाळ काढण्यात आला. त्यामुळे 'चुलत्याने विहीर बांधली, पुतण्याने गाळ काढला' अशी चर्चा सुरू झाली आहे. 

Web Title: after 22 year water in well