नगर - गिरवलेंच्या निधनानंतर माळीवाडा भागात पोलिस बंदोबस्तात वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नगर : जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय व गिरवले यांचे निवासस्थान असलेल्या माळीवाडा परिसरात सकाळपासून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिस कोठडीत असताना नगरसेवक कैलास गिरवले यांचा पोलिसांच्या मारहाणीतच मृत्यू झाला झाल्याचा आरोप करत पोलिसांवर कारवाई झाल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय गिरवले यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. तसेच त्यासाठी गिरवले यांचा मृतदेह पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आणून ठेवण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने पोलिस अधीक्षक कार्यालय व माळीवाड्यात देखील सकाळपासून तणाव आहे. 

दरम्यान, गिरवले यांच्या मृत्युचे नगरमध्ये पडसाद उमटण्याची शक्‍यता गृहीत धरुन माळीवाडा परिसरातील काही व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहेत. तसेच गिरवले यांचे कार्यकर्ते गटा-गटाने थांबून आहेत. गिरवले यांच्या निवासस्थानी नातेवाईकांनी गर्दी केली आहे. पोलिस कोठडीत असलेल्या गिरवले यांची प्रकृती रविवारी सकाळी बिघडल्याने त्यांना उपचारासाठी प्रथम नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गिरवले यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितल्याने गिरवले यांना तत्काळ पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे सोमवारी रात्री उशिरा उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मात्र, तत्पूर्वीच गिरवले यांच्या मृत्यूबाबत नगरमध्ये चर्चा सुरु होती. सोशल मीडियांवरील संदेशामुळे नातेवाईक, कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला होता. त्यात अधिकृत कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याने गिरवले यांचे कार्यकर्ते अस्वस्थ होते. 

Web Title: after death of girawale increased in police force in maliwada area