शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर टेंभूचे पाणी अपेक्षित गतीने सुरू

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर टेंभूचे पाणी अपेक्षित गतीने सुरू

आटपाडी - टेंभूच्या पाण्याने शेटफळे आणि माळेवाडीतील ओढ्यावरील बंधारे भरून देण्यास टाळाटाळ होत होती. यामुळे शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. परंतु, आज अधिकाऱ्यांनी दोन्ही गावचे बंधारे भरून देण्यासाठी टेंभूचे पाणी अपेक्षित गतीने सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. 

टेंभूच्या पाण्याने माळेवाडी आणि शेटफळे येथील बंधारे भरून देण्याची लेखी मागणी पाटबंधारे विभागाकडे गेल्या महिन्यात केली होती. तसेच पैसेही जमा केले होते. याला महिना लोटला तरीही बंधारे भरून दिले नाहीत. यासाठी शेतकऱ्यांनी खासदार संजय पाटील आणी आमदार अनिल बाबर यांचे दार ठोठावले. त्यानंतर चार दिवसापूर्वी पाणी सुरू केले. पाणी माळेवाडी गावच्या वेशीवर आले तेव्हा कराड येथील अधीक्षक अभियंता यांच्या आदेशावरून पाणी पुन्हा बंद केले. त्यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली. शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन टेंभूच्या मुख्य कालव्यात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला. याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन आज सकाळी पाण्याचाची गती आणि प्रवाह पूर्वीप्रमाणे सुरू केला. तेव्हा हे पाणी शेटफळेच्या दिशेने झेपावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com