पत्नीची हत्या करुन, आई व स्वतःला घेतले भोसकून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

वराडे (ता. कऱ्हाड) येथे काैटुंबिक वादातून चाकूने भोकसून पत्निचा खून करून आई व  स्वत:ला चाकूने भाेकसल्याची घटना 29 जून राेजी रात्री घडली हाेती. यामधील गंभीर जखमी असलेल्या आईचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 

उंब्रज (सातारा) :- वराडे (ता. कऱ्हाड) येथे काैटुंबिक वादातून चाकूने भोकसून पत्निचा खून करून आई व  स्वत:ला चाकूने भाेकसल्याची घटना 29 जून राेजी रात्री घडली हाेती. यामधील गंभीर जखमी असलेल्या आईचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कल्पना सदाशिव घोरपडे ( वय ५८ ) असे मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वराडे ता. कराड येथे २९ राेजी रात्री ९.३० च्या सुमारास सागर सदाशिव घोरपडे याने पत्नी मोहिनी व आई कल्पना यांना धारदार चाकूने भोकसले. आई व पत्नीस भोकसल्यानंतर सागर याने  चाकूने स्वतःलाही  भोकसले. घटनेबाबतची माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असताना पत्नी मोहिनी हिचा मृत्यू झाला असून आई कल्पना व मुलगा सागर हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू हाेते. उपचारावेळी कल्पना यांचा शनिवारी मृत्यू झाला. याबाबची फिर्याद संतोष घाडगे यांनी तळबीड पोलिसांत दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पाटील तपास करत आहेत

Web Title: After killing his wife, he killed mother and himself