प्रत्यक्ष परिस्थिती पाहूनच तक्रारीवर प्रांताधिकारी निर्णय देणार : संतोष पवार

हुकूम मुलाणी
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मंगळवेढा : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात मनमानी टाॅवर उभारणी विरोधातील योग्य मोबदल्यासाठी प्रत्यक्ष जागेवर पंचनामे केल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती पाहूनच दाखल केलेल्या तक्रारीवर निर्णय देण्याचे प्रांताधिकाऱ्यांनी मान्य केले असल्याची माहिती किसान बचाव संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.संतोष पवार यांनी दिली.

मंगळवेढा : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात मनमानी टाॅवर उभारणी विरोधातील योग्य मोबदल्यासाठी प्रत्यक्ष जागेवर पंचनामे केल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती पाहूनच दाखल केलेल्या तक्रारीवर निर्णय देण्याचे प्रांताधिकाऱ्यांनी मान्य केले असल्याची माहिती किसान बचाव संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.संतोष पवार यांनी दिली.

दिलेली भरपाई तोकडी दिल्याच्या निषेधार्थ सामुहिक आत्मदहन प्रांताधिकारी कार्यालयासमोर दिला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रांत अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. यावेळी महापारेषणचे अभियंता, भैरवनाथ शुगर व फेबटेक शुगरचे कार्यकारी संचालक व प्रा. संतोष पवार, मलकांण्णा धायगोंडे पांडूरंग चव्हाण, सत्याबापू कोळी, औदुंबर औताडे, संतोष पाटील आदी उपस्थित होते. प्रा. संतोष पवार यांनी शेतकऱ्यांची बाजूने समस्या व तक्रारी मांडल्या.

तालुक्यातील भाळवणी येथील 132 के .व्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यासाठी महापारेषणचे 67, भैरवनाथ शुगर चे 67 व फेबटेक शुगरचे 43 टॉवर उभारले आहेत. उपविभागीय अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांनी त्यापैकी दाखल केलेल्या तक्रारीवर 2 सप्टेंबरपर्यंत शासकीय नियमानुसार निकाल दिला जाईल व प्रत्यक्ष जागेवरील पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश उपविभागीय अधिकार्‍यांनी महापारेषण, फेबटेक शुगर नंदूर व भैरवनाथ शुगर यांना दिल्या आहेत.

टॉवर खालील पिकाखालील जागेचा, तारवाहिनी खालील घर, गोठा, विहीर, शेततलाव, झाड, तदंभूत घटकांचा प्रत्यक्ष पंचनामा करुन या कार्यालयाकडे माहिती सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकार्‍यांनी दिले. प्रत्यक्ष पंचनाम्याला वेळ लागणार असून या नियोजन व समन्वयासाठी साठी 15 दिवसांत सर्वांची बैठक आयोजित करु असे उपविभागीय अधिकार्‍यांनी सांगितले. यापूर्वी तक्रार दाखल न केलेल्या टॉवर बाधित शेतकऱ्यांच्या बाबतीत ही त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर निर्णय देण्याचे उपविभागीय अधिकार्‍यांनी मान्य केले आहे.

Web Title: after site seeing will give decision said santosh pawar