
बेळगाव : बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी (ता. 18) बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला असून यामध्ये बहुतांश पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.
लोकसभा पोटनिवडणूक पूर्ण होईपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी यांची बदली सीआयडी विभागात करण्यात आली असून त्यांच्या जागेवर दिलीप कुमार के. एच. यांची वर्णी लागली आहे. हिरेबागेवाडीचे पोलिस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांची कारवारला बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर शरणगौडा हिरेकेंचनगौडा यांची नियुक्ती केली आहे. वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी यांची आयएसडी विभागात बदली झाली असून त्यांच्या जागेवर महाबळेश्वर नाईक यांची नियुक्ती झाली आहे.
सीसीआरबीचे पोलिस निरीक्षक श्रीनिवास हंडा यांची बदली हुबळी धारवाड येथील एअरपोर्ट सिक्युरिटी येथे असून त्यांच्या जागेवर जगदीश हंचनाळ यांची बदली झाली आहे. सीएन पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांची बदली धारवाडला झाली असून त्यांच्या जागेवर विजय बिरादार यांची नियुक्ती झाली आहे. शहर एएसबी विभागाचे पोलिस निरीक्षक यल्लनगौडा नावलगट्टी त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर अल्ताफ मुल्ला तर काकतीचे निरीक्षक राघवेंद्र हल्लूर यांची सीआयडी विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर कुमारस्वामी एस. पी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खडेबाजारचे पोलिस निरीक्षक धीरज शिंदे यांची सीआयडी विभागात बदली झाली आहे.त्यांच्या जागेवर रवि एम. एस. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीकर यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर सय्यददादा नूरअहमद यांची नियुक्ती झाली आहे. बैलहोंगलचे निरीक्षक यु. एच. सातेनपहळ्ळी, जिल्हा सीइएन विभागाचे वीरेश दोडमनी, मुडलगीचे व्यंकटेश मुरणाळ यांचीही बदली झाली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या ठिकाणी हजर व्हावे, असा आदेश राज्य सरकारने बजावला आहे. लोकसभा पोटनिवडणूक पार पडल्यानंतर पुन्हा पूर्वीचे पोलिस निरीक्षक आपल्या ठिकाणी पदभार स्वीकारणार आहेत.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.