स्पर्धेच्या युगात दिव्यांगानी समाजात उच्च स्थान प्राप्त करावे - आवताडे

हुकूम मुलाणी
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मंगळवेढा - जन्मताच अपंगत्व वाट्याला आले म्हणून निराश न होता उलट असलेल्या गुणांना वाव देऊन स्पर्धेच्या युगात दिव्यांगानी समाजात उच्च स्थान प्राप्त करावे असे आवाहन श्री संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. जि. प. समाज कल्याण विभाग व अपंग स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून जागतिक अपंग दिनानिमित्त येथील न्यू इंग्लीशमध्ये जिल्हास्तरीय अपंग स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

अध्यक्षस्थानी जि.प.विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे होते. यावेळी समाज कल्याण सभपती शिला शिवशरण, महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी परमेश्वर राऊत, सभापती प्रदीप खांडेकर, जि.प.सदस्या शैला गोडसे, नंदा फुले, मंजुळा कोळेकर, नितीन नकाते, दिलीप चव्हाण, शिवाजी सोनवणे, अॅड.सुजित कदम, नागराज पाटील, गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार जाधव सचिन शिवशरण, गटशिक्षणाधिकारी बजरंग पांढरे, उपस्थित होते. 

काका साठे म्हणाले की, अपंग विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य असल्याने त्यांना वाव दिला तर ते जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवू शकतात. सभापती देशमुख म्हणाल्या निसर्गाने अन्याय करून देखील ही अपंग मुले परिस्थितीवर मात करतात ते अपंग नाहीत तर जे हातपाय धड असून देखील कर्तुत्व सिद्ध करीत नाहीत तेच खरे अपंग आहेत. यावेळी क्रीडा शिक्षक कविता कोळगे, प्रशांत पवार, कालीदास लोखंडे, विजयकुमार दळवी यांचा सत्कार केला. रामहरी कदम, संदीप गायकवाड, आकाश देवकर, तुषार शेळके या क्रीडा पटूंनी क्रीडा ज्योत आणली. रुपाली धस या विद्यार्थिनीने खेळाडूना शपथ दिली. उपस्थिताचे स्वागत सभापती शिला शिवशरण यानी स्वागत केले.

प्रास्तविक परमेश्वर राऊत यांनी, तर सू्त्रसंचालन दत्ता मोकाशी यांनी केले.

Web Title: In the age of competition disables should get respect in society