गाळा कंपनी विरोधात कामगार आक्रमक 

wada
wada

वाडा - वाडा तालुक्यातील मुसारणे येथील गाळा कंपनीत गेली 12 वर्षे सातत्याने काम करीत असूनही अजूनही कंपनी प्रशासनाने कामगारांना कायम स्वरूपी केले नसल्याने गाळा कंपनीच्या तीन कामगारांनी भारतीय कामगार सेनेच्या झेंड्याखाली आज पासुन कंपनीच्या प्रवेशद्वारा समोर बेमुदत उपोषण सुरू केले असून कामगार आक्रमक झाले आहेत.न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार उपोषणकर्त्यानी केला आहे. 

वाडा तालुक्यातील मुसारणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत' गाळा प्रेसीजन इंजिनिअर' ही कंपनी आहे. या कंपनीत गाड्यांचे पार्टस चे उत्पादन केले जाते. या कंपनीत एकनाथ पाटील, नम्रता पाटील,अश्विनी पाटील हे तिन कामगार गेली 12 वर्ष सातत्याने या कंपनीमधे काम करत आहेत.विशेषतः यातील दोन्ही महिला कामगार या विधवा आहेत.या कामगारांनी कंपनी व्यवस्थापनेकडे कायम करण्यासाठी सातत्याने मागणी करत आहेत.मात्र कंपनी व्यवस्थापनाकडून सातत्याने उडवाउड़वीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप या कामगारांकडून केला जात आहे. 

कंपनीत तिनही कामगरांना कायम करावे,इतर कामगारांच्या पगार वाढीप्रमाणे पगारवाढ द्यावी,कायम कामगारांना मिळणाऱ्या सर्व सोयी-सुविधा देण्यात याव्यात या मागण्यांकडे कंपनी प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी आज पासुन बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

गाळा कंपनीतील कामगार गेल्या बारा वर्षापासून काम करीत असून कंपनी प्रशासनाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. एवढ्या प्रदीर्घ वर्षं काम करूनही त्यांना कंपनी प्रशासन कायम करीत नाहीत. कंपनीने कामगारांच्या नियम व कायद्याचे उल्लंघन केले आहे. कामगारांना न्याय मिळावा म्हणून आम्ही बेमुदत उपोषण सुरू केले असून न्याय मिळावा म्हणून आम्ही बेमुदत उपोषण सुरू केले असून न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील 
मिलिंद चौधरी चिटणीस भारतीय कामगार सेना 

सदर कामगारांना इतर कामगारां प्रमाणे सोयी सुविधा देण्यास कंपनी प्रशासन तयार आहे. मात्र कायम करण्याबाबत अडचण आहे. 
तुकाराम भेरे व्यवस्थापक गाळा प्रेसीजन इंजिनिअर कंपनी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com