पाकिस्तान जला दो...! भ्याड हल्ल्याच्या कोल्हापुरात तीव्र निषेध

पाकिस्तान जला दो...! भ्याड हल्ल्याच्या कोल्हापुरात तीव्र निषेध

कोल्हापूर - जम्मू-काश्‍मिरमधील पुलवामा जिल्ह्यात आतंकवाद्यानी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या शहरात तीव्र निषेध नोंदविला. मुस्लिम समाजासह, हिंदूत्ववादी संघटना, तालीम मंडळे, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विविध पक्ष संघटनेसह कार्यकर्त्यांनी "जला दो, जला दो, पाकीस्तान जला दो' अशा घोषणा देत पाकिस्तान ध्वजाची होळी केली. आता सर्जिकल स्ट्राईक नको; तर पाकिस्तानला चोख उत्तर द्या, अशी मागणी केली. 

दी मोहामेडियम एज्युकेशन सोसायटी, मुस्लिम समाज, जिल्हा बैतुलमाल कमिटीतर्फे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधन केला. दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. आता सर्जिकल स्ट्राईक न करता पाकिस्तानातील अतिरेक्‍यांचे अड्डे उद्‌ध्वस्त केल्याशिवाय भारत सरकारने गप्प बसू नये, अशी मागणी केली. सरकारने कोणतेही राजकारण करुन नये, असे सांगितले.

शहरातील सर्व मशिदीमध्ये अमन आणि शांती वाहिली. देश खंबीरपणे उभा राहावा, म्हणून दुवा ही केली. जला दो, जला दो, पाकिस्तान जला दो, हिंदूस्थान झिंदाबाद, सारे जहॉं से अच्छा, हिंदोस्ता हमारा, हम सब एक हैं, शहिद जवान अमर रहे च्या घोषणा दिल्या. 

संस्थेचे प्रशासक कादर मलबारी म्हणाले, ""या देशातील मुसलमानांनी देश स्वतंत्र करण्यासाठी रक्ताची आहुती दिली आहे. 70 हजार धर्मगुरुंना फासावर दिले, तेव्हा हा देश स्वतंत्र 
झाला. ज्यांना इस्लाम धर्माचे तत्वज्ञान माहिती नाही, अशा प्रवृत्तीच्या अतिरेक्‍यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला.''

अध्यक्ष गणी आजरेकर म्हणाले, ""पाकिस्तानला धडा शिकविला पाहिजे. सक्षम यंत्रणा भारताकडे होती. केंद्र सरकारने या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करावी.'' 

आदील फरास यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक हाजी पापाभाई बागवान, हाजी जहॉंगीर अत्तार, रफिक शेख, अल्ताफ झांजी, हमजेखान शिंदी आदी उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी चौकात समस्त हिंदू संघटनेतर्फे भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविला. सकाळी कार्यकर्ते शिवाजी चौकात जमा झाले. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी ध्वज पायदळी तुडवला त्यानंतर तो पेटवून संतप्त भावना व्यक्त केल्या. पाकिस्तान जलादो, "पाकिस्तान मिटा दो'च्या घोषणांनी परिसर दणाणला.

नगरसेवक ईश्‍वर परमार, संजय साडविलकर, अशोक रामचंदाणी, अनिरुद्ध कोल्हापूर, संतोष घोडघडीकर, सुहास लोकरे, केशव गोवारिकर, जयवंत निर्मल, मयूर तांबे, अवधूत भाट्ये, सुवर्णा पोवार, स्वानंद कुलकर्णी, विनायक कोरे, सारंग कुलकर्णी, अवधूत साळोखे, राजू यादव, उदय भोसले, स्वप्नील पार्टे, बाबा वाघापूरकर, शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते. 

लक्षवेधी फलक 
मोदी आता केवळ सर्जिकल स्ट्राईक नको; आता हवा पाक पुरस्कृत आतंकवादांचा समूळ नाश. पाकिस्तान कलाकारांना देशातून हकलून द्या, अशा फलकाद्वारेही भ्याड हल्ल्याचा निषेध कार्यकर्त्यांकडून नोंदविला. 

शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी 
मिरजकर तिकटी येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा शिवसेना, युवा सेना व महिला आघाडीतर्फे निषेध नोंदविला. पाकिस्तान ध्वज तिरडीवर ठेऊन त्याची होळी केली. "पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या.

जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव, सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, मनजित माने, मयूर साळोखे आदी उपस्थित होते. 

शिवबांचा मावळातर्फे निषेध 
मिरजकर तिकटी येथे शिवबांचा मावळा संघटनेतर्फे अतिरेक्‍यांच्या भ्याड हल्ल्या निषेध नोंदविला. या नंतर संघटनेतर्फे दशहतवादी अझर मसूदच्या पुतळ्याचे दहन केले. "पाकिस्तान जला दो'च्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

संघटनेचे संस्थापक अमोल माने, जिल्हाध्यक्ष जयदीप सरवदे, जयकुमार शिंदे, नगरसेवक ईश्‍वर परमार, आदिल फरास, महेश वासुदेव, विनोद जाधव, किशोर माने, कपिल जाधव, मंगेश माने, किसन कल्याणकर, रियाज कागदी, अशोक चौगले, उमेश पोतदार, लहू शिंदे, सचिन लोहार, पवन भोसले, असिफ शेख, एहसान शेख आदी उपस्थित होते. 

कोल्हापूर जनशक्तीतर्फे निषेध 
"कोल्हापूर जनशक्ती'तर्फे पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. बिंदू चौकात निदर्शने झाली. जम्मू-काश्‍मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांचा हल्ला झाला. या आत्मघाती हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 40 जवान शहिद झाले. आता पाकिस्तान विरोधात निर्णायक लढा देऊन या भूमीवरुन दहशतवाद कायमस्वरुपी निखडून काढावा, अशी मागणी केली. सर्व कार्यकर्ते बिंदू चौकात जमा झाले. काळ्या फिती बांधून, हातात निषेधाचा फलक घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणा केली. मिटा दो मिटा दो, आतंकवादी मिटा दो, पाकिस्तान मुर्दाबाद, शहिद जवान अमर रहें, दहशतवादी भ्याड हल्ल्याचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या. संघटनेचे समीर नदाफ यांनी या दहशतवादी संघटनेचे चेहरे जरी वेगवेगळे असले तरी त्यांचा बाप हा पाकिस्तान आहे. थेट युद्धाद्वारे पाकिस्तान जिंकू शकत नसल्याचे सिद्ध झाले आहे. दहशतवादाला खतपाणी घालून भारताविरोधात छुपे युद्ध करत आहे. त्याचे नामोनिशान जगाच्या नकाशावरुन मिटवून टाकावे, असे आवाहन केले. 

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन 
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनतर्फे निषेध करण्यात आला. ""आता कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तान बरोबर चर्चा न करता त्यांची जागा पाकिस्तान उद्‌ध्वस्त करुन दाखवावी. भारताची ताकद दाखवावी. संपूर्ण देशवासीय सैन्य दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सरकारने एकदा सर्जिकल स्ट्राईक करुन जगाच्या नकाशावरुन पाकिस्तानचे नाव पुसून टाकावे'', असे जिल्हाध्यक्ष रफिक शेख यांनी सांगितले. बापू मुल्ला, अमीन फकिर, गौसखान पठाण, हाजी रफिक बागवान, बाबासो मुल्लाणी, मेहताब मुल्ला, अन्वर मुल्ला, गौस मुल्लाणी, दस्तगीर बागवान, राजू काझी, बशीर राऊत आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com