बंजारा समाजाचे सोलापुरात धरणे आंदोलन 

solapur
solapur

सोलापूर : बंजारा समाजासाठी तिसरी अनुसूची निर्माण करून या समाजालाही अनुसूचित जाती व जमातीप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तीनशे लोकसंख्या असलेल्या तांड्यांना महसूल गावाचा दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत जाहीर करावी. शासकीय जमिनीवरील तांड्यातील कुटुंबीयांना मालकी स्वरूपात भूखंड वाटप करावेत या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी माजी महापौर अलका राठोड, कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी सभापती नगरसेविका अश्‍विनी चव्हाण, मोतीराम चव्हाण, कविता चव्हाण, संदीप राठोड, कलाप्पा राठोड, मोतीराम राठोड, शिवलाल राठोड, धर्मा राठोड, प्रकाश राठोड, अमृता चव्हाण आदी उपस्थित होते. उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. विमुक्त भटक्‍यांना नोकरीतील बढतीमध्ये आरक्षण मिळावे. बंजारा समाजाचा पारंपरिक व्यवसाय म्हणून द्राक्ष मळी पासून दारू उत्पादनास प्रायोगिक तत्त्वावर शासन मान्यता मिळावी. विमुक्त भटके बंजारा समाजासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबवावी या मागण्यांचा समावेश आहे. धरणे आंदोलन केल्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेते स्वार्थी आहेत. या पुढच्या निवडणुकीत आपल्या भटक्‍या जातीच्या उमेदवारांना मतदान करा. महाराष्ट्रातील भटक्‍या विमुक्तांनी नवे राजकीय समीकरण तयार करावे. सध्या केंद्र व राज्य सरकारला माणसांपेक्षा जनावरांवर (गाय) अधिक प्रेम आहे. सरकारने भटक्‍या विमुक्तांसाठी नुसत्या मंत्रालयाची स्थापना केली परंतु त्यासाठी निधी दिला नाही. 
- लक्ष्मण गायकवाड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com