Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

भगवे झेंडे घेतलेले तरुण हलगीचा कडकडाट मर्दानी खेळ छत्रपती शिवाजी आणि ताराराणी स्वरूपातील युवक-युवती अशा लवाजम्यासह उभा मारुती चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला.

कोल्हापूर - शिवाजी पेठेतर्फे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. भगवे झेंडे घेतलेले तरुण हलगीचा कडकडाट मर्दानी खेळ छत्रपती शिवाजी आणि ताराराणी स्वरूपातील युवक-युवती अशा लवाजम्यासह उभा मारुती चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला.

मोर्चामध्ये महापौर शोभा बौंद्रे, आमदार चंद्रदीप नरके, उपमहापौर महेश सावंत, अरुण नरके, माजी आमदार सुरेश साळुंखे, आजी माजी नगरसेवक त्याचप्रमाणे शिवाजी पेठेतील युवक महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवाजी तरुण मंडळापासून निघालेला मोर्चा महाद्वार रोड, पापाची तिकटी, दसरा चौक स्टेशन रोड मार्गे करण्यात आला. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. 'जय भवानी जय शिवाजी' असा जयघोष करत युवक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुरेश साळोखे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदींची भाषणे झाली. मोर्चाच्या वतीने पाच युवतींनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. 

kolhapur

Web Title: Agitation At Collector Office Of Kolhapur For Maratha Reservation