पंढरपुरात धनगर समाजाचे बेमुदत उपोषण; तिघांची प्रकृती खालावली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

धनगर समाजाच्या या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा पांडूरंग मिरगळ यांनी दिला आहे. आता सरकार या आंदोलनाची गंभीर दखल घेणार का? याच्याकडे समाजाचे लक्ष आहे.

पंढरपूर : अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी पाच वर्षांपासून धनगर समाजाची टोलवाटलोवी सुरू असल्याने पंढरपूरात पाच दिवसांपासून धनगर बांधवाचे आमरण उपोषण सुरू आहे. पाच दिवसानंतर ही सरकारने दखल घेतली नाही. उपोषणकर्त्यांपैकी तिघांची प्रकृती खालावली आहे.

पाच वर्षांपूर्वी बारामतीतले धनगर समाजाचे उपोषण तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले होते. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याच आश्वासन दिले. मात्र आज शेवटची कॅबिनेट बैठक होण्याची वेळ आली तरी सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक दिसत नाही.

9 ऑगस्ट क्रांती दिनापासून धनगर आरक्षण समन्वय समितीचे समन्वयक पांडूरंग मेरगळ आणि त्यांच्या आठ सहकार्यानी पंढरपूरात आमरण उपोषण सुरू  केल आहे. आज पाचवा दिवस आहे. तीन जणांची प्रकृती बिघडली आहे. धनगर समाजाच्या दोनच मागण्या आहेत. ज्या पध्दतीने मराठा समाजासाठी सरकारने सर्व खर्च केला न्यायालयीन लढाई लढली. तसाच धनगर आरक्षण याचिकेचा खर्च करावा. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत  सलग याचिकेची सुनावणी घ्यावी आणि एसटी सर्टिफिकेट हातात द्याव हीच मागणी आहे.

धनगर समाजाच्या या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा पांडूरंग मिरगळ यांनी दिला आहे. आता सरकार या आंदोलनाची गंभीर दखल घेणार का? याच्याकडे समाजाचे लक्ष आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation for dhangar reservation in Pandharpur