ई लिलावाच्या मागणीसाठी रिपब्लिकन मोर्चाचे महापालिकेत आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

सोलापूर : शहराची बेरोजगारी दूर करा आणि महापालिकेच्या गाळे लिलावाची प्रक्रिया तातडीने सुरु करा या मागणीसाठी आज गुरुवारी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने महापालिकेत धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर संघटनेच्यावतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

सोलापूर : शहराची बेरोजगारी दूर करा आणि महापालिकेच्या गाळे लिलावाची प्रक्रिया तातडीने सुरु करा या मागणीसाठी आज गुरुवारी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने महापालिकेत धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर संघटनेच्यावतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

आता नाहीतर परत कधीच होणार नाही अशी घोषणाबाजी करत युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेची आर्थिक उन्नती होत नसून दिवसेंदिवस महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे यामुळेच महापालिकेची आर्थिक दृष्टी दुर्बल होत चालली आहे शहराचा विकास मोठ्या प्रमाणात खुंठला आहे अशावेळी महापालिकेची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी महापालिकेच्या गाळे लिलावाची प्रक्रिया त्वरित राबविणे महापालिकेसह शहरातील बेरोजगारांसाठी हितावह आहे.

महापालिका आयुक्तांनी घेतलेला निर्णय हा योग्य असून काही मूठभर विकृत बुद्धीचे पुढारी आणि सूडबुद्धीचा राजकारणामुळे याचा परिणाम सर्वांना भोगावं लागत आहे अशा स्थितीत रिपब्लिकन युवा मोर्चा आयुक्त व महापालिका प्रशासनाच्या पाठीशी राहणार असून महापालिकेने आता कोणत्याही प्रकारचा विरोध न पाहता सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने गाळ्यांचा लिलाव सुरु करावा अशा मागणीचे निवेदन आयुक्तांना संघटनेच्यावतीने शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले. या धरणे आंदोलनात युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिपक गवळी  मातंग समाजाचे मध्यवर्ती अध्यक्ष महादेव भोसले सचिन गायकवाड सचिन तोरणे बाळू गौडराव लखन रणदिवे दिलीप जाधव यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: agitation for e auction by republican party in solapur municipal corporation