कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतर वीज दरवाढ विरोधी आंदोलन मागे

कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतर वीज दरवाढ विरोधी आंदोलन मागे

शिरोली पुलाची - ३१ जानेवारीपर्यंत वीज दरवाढ रद्दबाबतचे शासन परिपत्रक काढणार असल्याचे आश्वासन कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर महामार्ग रोको आंदोलन मागे घेण्यात आले. 

अवाजवी वीज दरवाढ रद्द करावी, शेती पंपांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकी रद्द करावी, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व सर्व पक्षीयांतर्फे पंचगंगा पुलावर आज महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. 

यावेळी आंदोलकांकडून शासनाच्या धोरणावर जोरदार टीका करण्यात आली. तसेच शासनाकडून वीज दरवाढ रद्दबाबतचे पत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा सर्व पक्षीय नेत्यांनी दिला होता. पण कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देत वीज दरवाढ रद्दबाबत परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले हे आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान आज सकाळी अकराच्या सुमारास आंदोलनास सुरवात झाली. शिरोली पुलाच्या उत्तरेस उभारलेल्या व्यासपीठावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. .

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या - 

  • सर्व कृषी पंप धारकांची मीटर रिडींग न घेता सरासरी जादा दिलेल्या बिलांच्या योग्य दुरुस्त्या कराव्यात
  • दुरुस्त केलेल्या वीज बिलांना कृषी संजीवनी जाहीर करावी
  • कृषी पंपधारकांना नवीन वीज दर सवलतीचे असावेत
  • शासकीय पाणी पट्टीचे दर सवलतीचे ठरवावेत
  • औद्योगिक वीज दरवाढ रद्द करण्यासाठी सरकारने ३४०० कोटी रूपयांचे अनुदान द्यावे
  • घरगुती वीज दरवाढ रद्द करावी
  • कृषी पंप शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा १२ तास वीजपुरवठा करावा
  • गुऱ्हाळघरांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करावा

खासदार धनंजय महाडिक,  खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, डॉ. सुजीत मिणचेकर, सत्यजीत पाटील, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, अरूण लाड, भगवान काटे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, आर. जी. तांबे, रणजित जाधव, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, माजी आमदार संजयबाबा घाटगे हे या आंदोलनात सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com