टँकरमधील सर्व दुध रस्त्यावर ओतुन जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन

राजकुमार शहा 
शनिवार, 2 जून 2018

मोहोळ : 1 जुन पासुन सुरू झालेल्या शेतकरी संपात जनहित शेतकरी संघटना सहभागी झाली आहे. शुक्रवारी रात्री पंढरपूर मोहोळ राज्यमार्गावरील पेनूर फाटयाजवळ दुध घेऊन निघालेल्या टँकरमधील सर्व दुध रस्त्यावर ओतुन देण्यात आले. कुठल्याही प्रकारचा शेतीमाल मुंबईकडे जाऊ न देण्याची भुमिका जनहित शेतकरी संघटनेने घेतल्याची माहिती अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिली त्यामुळे आंदोलनाचे लोन आता मोहोळ तालुक्यात पोचले आहे.

गाईच्या दुधाला तीस रुपये म्हशीच्या दुधाला चाळीस रुपये भाव दयावा. शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे. ज्या साखर कारखान्यानी ऊसाची एफ.आर.पी. अद्याप दिली नाही त्यांना गाळप परवाना देऊ नये. पशुखाद्याचे भाव वारंवार वाढत आहेत, दुभत्या जनावराला दिवसाला 160 रुपयाचा चारा लागतो.  मात्र त्या मानाने दुधाला भाव मिळत नाही. सतत तोटा होत असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. सध्या ज्या 132 संघटना शेतकरी संपात सहभागी झाल्या आहेत त्यांना आमचा पाठींबा असल्याचे देशमुख यांनी सांगीतले.

शासनाने या बाबत लवकर निर्णय घ्यावा अन्यथा अंदोलन तीव्र करण्याचा इशारा देशमुख यांनी दिला यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: The agitation of the janhit farmers' association, pouring all the milk from tankers on the streets