दूधाला योग्य हमी भाव देण्यासाठी जेलभरो आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

तहसिलदार कार्यालयासमोर दूधाला  शासनाने जाहीर केलेला दर दूध सघांनी शेतकऱ्यांना द्यावा, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत दर द्यावा, स्वामिनाथन  आयोग शासनाने लागू करावा, सरसकट कर्जमाफी द्यावी, विज बिले माफ करावी आदी मागण्यांसाठी शेतकरी नेते रघूनाथदादा पाटील प्रणित शेतकरी सघंटनेच्या नेतृत्वाखाली, " जेल भरो " आंदोलन झाले.

कऱ्हाड :  दूधाला योग्य हमी भाव द्यावा या मागणीसाठी येथील तहसीलदार कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन झाले. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील प्रणीत संघटनेने आंदोलन केले. 

येथील तहसिलदार कार्यालयासमोर दूधाला  शासनाने जाहीर केलेला दर दूध सघांनी शेतकऱ्यांना द्यावा, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत दर द्यावा, स्वामिनाथन  आयोग शासनाने लागू करावा, सरसकट कर्जमाफी द्यावी, विज बिले माफ करावी आदी मागण्यांसाठी शेतकरी नेते रघूनाथदादा पाटील प्रणित शेतकरी सघंटनेच्या नेतृत्वाखाली, " जेल भरो " आंदोलन झाले.

त्यात हिदूंराव ज्ञानू पाटील, कोरेगाव कार्वे. कराड, पांडुरंग गुलमा पाटील, रमेश शंकर सावंत भार्गव श्रीरंग पाटील, दीपक जगन्नाथ सावंत, महेश आनंदराव सावंत, आनदंराव सदाशिव थोरात, सतीश उत्तम थोरात, संभाजी रघुनाथ शिंदे,हणमंत बाजीराव शिंदे, विकास शिवाजी मुळीक, राजेंद्र निवास थोरात, राजाराम जगन्नाथ हुलवान,अंकुश शंकर निकम आदीे कार्यकर्ते  उपस्थित आहेत.अद्याप जेलभरो आंदोलन सुरू झालेले आहे सुमारे वीस मिनिटे आंदोलन झाले.

Web Title: agitation in Karhad