मंगळवेढा: वाळू साठा करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी उपोषण

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा : तालुक्यातील अरळी येथे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली, पण वाळू भरणाऱ्या जेसीबी व वाळू साठा करणाऱ्याला या कारवाईतुन वगळल्याच्या कारणावरून मंगळवेढा येथील पत्रकार संतोष मोरे यांनी पोलिस स्टेशन समोर लाक्षणिक उपोषण सुरू केले.

तालुक्यातील विविध प्रश्नांच्या संबधित पाच शासकीय कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनी आत्मदहन व आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यामुळे पोलिस प्रशासनाची तारांबळ उडत आहे. यामध्ये फेसबुक पोस्टवरून झालेल्या खून प्रकरणातील दोन नगरसेवक आरोपीला अटक करण्यास पोलिसांकडून विलंब होत असल्याने यांच्या अटकेच्या मागणीसाठी मयत सचिन कलुबर्मेचे वडील ज्ञानेश्वर कलुबर्मे यांचे पोलिस स्टेशनसमोर आमरण उपोषण, शिक्षण खात्याच्या प्रचलित नियमानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी सेवा पुस्तकांची दुयम व कर्मचाऱ्याम सेवा जेष्ठता यादी हे नियम पाळणे बंधनकारक असताना ताराराणी गर्ल्स हायस्कूल मंगळवेढा वरील मुलभर हक्कापासून वंचीत ठेवल्याचे निशेधार्थ पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालयासमोर वृषाली कोष्टी, भारत दत्तु, प्रविण शिंदे यांचे आमरण उपोषण, सुखदेव डोरले  यांचे
नगरपरिषदेने अदयापही रस्ता रुंदीकरण व अतिक्रमन न काढलेल्या निषेधार्थ
नगरपलिकेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण,उदय शिंदे व इतर रा डिकसळ यांचे पंढरपूर मंगळवेढा उमदी या महामार्गाचे संपादन होवून संपादीत जमीनीची नुकसान भरपाई मिळणेबाबत प्रांत कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा  तर विजय भालेराव रा. बठाण व अन्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी पंचायत समिती मंगळवेढा येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

गेल्या दिवसांपुर्वी भीमा नदीच्या पात्रातुन  सुरू असलेल्या वाळू वाहतूकीविरूद्ध स्थानिक पोलिसांच्या धिम्या गतीतील कारवाईमुळे धडक कारवाईची मोहीम जिल्हा प्रमुख विरेश प्रभु यांच्या सुचनेनुसार उघडली. यात तांडोर व सिध्दापूर मोठी कारवाई जिल्हा पथकानेच केली. यात मोठा ऐवज व साहित्य पोलिसांनी हस्तगत केले पण अरळी येथे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक कारवाई केली पण जे.सी.बी ला व वाळू साठा करणाय्राला यातुन वगळले. त्यामुळे पोलिसांची कारवाई संशयास्पद वाटल्याने पत्रकार संतोष मोरे आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलिस स्टेशन समोर लाक्षणिक उपोषण सुरू केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com