म्हैसाळच्या पाण्यासाठी शिरनांदगी तलावात आंदोलन

bhose
bhose

भोसे : म्हैसाळच्या पाण्यासाठी शिरनांदगी तलावात जि. प. सदस्या शैला गोडसे यांच्या आंदोलनाच्या तिसय्रा दिवशी जनहित शेतकरी संघटना, मंगळवेढा तालुका दलित पॅन्थर संघटना, शिवबुदध युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य संकल्प महिला बहुउद्देशिय संस्था,  विकास अपंग स्वयसंयता समूह, या विविध संघटनांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट देवून पाठीबा दिला.

दरम्यान सोशल मिडीयात पाणी सोडण्या आदेशाच्या बातम्या आल्या असल्या तरी प्रत्यक्षात पाणी कधी येणार याच्या प्रतीक्षेत या भागातील शेतकरी आहेत.याशिवाय आसबेवाडी,  मारोळी, बावची, चिखलगी,भोसे ,रेड्डे ,महमदाबाद, हुन्नूर,जंगलंगी, पौट, सलगर खु, हुलजंती, या भागातील शेतकरी ग्रामस्थ महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून पाणी सोडण्याबाबत काही निर्णय लवकर न झाल्यामुळे शेतकरी महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत वेळीच निर्णय झाला नाही तर आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हैसाळ योजनेचे उपअभियंता राजेंद्र गाझी यांनी भेट दिली परंतू ते निर्णय न घेणारे अधिकारी असल्यामुळे त्यांनी निर्णय न घेता निघून गेले. पोलीस निरीक्षक   अनिल गाडे यांनी भेट दिली. तसेच तालुकाध्यक्ष येताळा भगत दामाजी मोरे दय्राप्पा कांबळे संदिप मुटकुळे भारत आसबे  गंगाधर मसरे डाॅ.बाळासाहेब सरवळे दत्ता कळकुबे विनोद सोनवले संभाजी खापे नामदेव मेडीदार मनोज खांडेकर अंकुश खताळ आबा  खांडेकर संतोष बिराजदार नारायण गोवे विजय कुलबरमे   तानाजी काशीद समाधान बंडगर मल्हारी करे काकासो मिसकर शंकर भगरे  सुधीर अभंगराव रविंद्र मुळे बाबा अभंगराव विनायक वनारे सुनिता खटकाळे सुरेखा आसबे सविता शिंदे सुरेखा सलगर कविता स्वामी  माया सपकाळ सुर्वणा कुंभार देवकता सुरवसे सुरेखा गोवे सविता गोवे आदी उपस्थित  होते.

शैला गोडसेंचा मुक्काम तलावातील पत्रा शेडमध्ये
म्हैसाळच्या पाण्यासाठी शैला गोडसे गेल्या तीन दिवसांपासून तलावतच रात्रणदिवस ठाण मांडून बसल्या अजून प्रशासनाने गांभीर्याने घेत नसल्याने त्या ही पाणी पूजन करूनच उठणार या मागणीवर ठाम आहेत सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. प्रचंड गारवा आहे, लाईट नाही, महिलांसाठी आवश्यक शौचालाय नाही. अशा गंभीर परस्थिती मध्ये ही शैला गोडसे या महिला प्रतिनिधी तलावतच मारलेल्या पत्रा शेड मध्ये रात्र जागून काढत असल्याने प्रशासन महिलांच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसत आहे.

पाणी सोडण्याच्या बाबतीतील विषय आपण समजून घेऊन वेळोवेळी आश्वासने देऊनही म्हैसाळ योजनेचे अधिकारी पाणी सोडत नसतील तर ते चुकीचे आहे.आपण तोडग्यासाठी प्रयत्न करू. 
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com