भिडेंच्या अटकेसाठी सांगलीत घंटानाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे 

Agitation by people infront of collector office for arrest Bhide
Agitation by people infront of collector office for arrest Bhide

सांगली - कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपी संभाजीराव भिडे यांना अटक करा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर दुर्लक्ष करून सरकार झोपेचे सोंग घेत आहे. त्यामुळे सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी भारिप बहुजन महासंघ, सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन झाले. 

सांगलीत भिडे यांच्या सन्मानार्थ झालेल्या मोर्चानंतर या संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भिडे यांच्यावर गुन्हा दाखल असून त्यांना फडणवीस सरकारचे अभय असल्याने अद्यापही अटक करण्यात आलेले नाही असा आरोप करण्यात आला होता. मुख्यमंत्री तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भिडेंवर आजपर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती द्यावी, श्वेतपत्रिका जनतेसमोर जाहीर करावी. भिडेंना त्वरित अटक करावी, त्यांच्या समर्थनार्थ निघालेल्या विना परवानगी मोर्चा व होर्डिंग्जबद्दल संयोजकांवर गुन्हे दाखल करावेत, बेकायदेशीर मोर्चात नंग्या तलवारी बाळगून दहशत माजविणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, त्याबद्दलही स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करावेत. ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती द्यावी, एससी-एसटी विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती तत्काळ अदा करावी, टीआयएसएस विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, तसेच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, ऍट्रोसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच कायदा कडक करावा आदी मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तत्पुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घंटनाद करून सरकारला जागे करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com