स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे

राजकुमार शहा 
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

मोहोळ : ट्रान्सफॉर्मर जळाल्यावर शेतकऱ्याकडून सक्तीची वसुली थांबवावी, विजबिल माफ करावे, रात्रीचे भारनियमन बंद करावे या सह अन्य मागण्यासाठी मोहोळ येथील विद्युत महापारेषण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विशालसिह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसाचे धरणे अंदोलन करण्यात आले. दरम्यान सहायक आभियंता अनिल अंकोलीकर यांनी अंदोलनकर्त्यांना लेखी पत्र दिल्यावर अंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी पवार म्हणाले सध्या दुष्काळी परिस्थीती असतानाही ट्रान्सफॉर्मर जळाल्यावर शेतकऱ्या कडुन पाच ते दहा हजार रुपये बिल सक्तीने वसुल केले जाते व ट्रान्सफॉर्मर लवकर दिला जात नाही . ट्रान्सफॉर्मर जळाल्यापासून चोवीस तासात तो द्यावा. रात्रीचे भार नियमन शेतकऱ्यांना अडचणीचे आहे ते बंद करावे या मागण्या केल्या.

दरम्यान मोहोळ येथील महापारेषणचे सहाय्यक अभियंता अनिल अंकोलीकर यांनी भारनियमनाचे वेळापत्रक हे वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार केले जाते, तसेच या कार्यालयाकडुन कुणाचीही अडवणुक केली जात नाही, तरीही आपल्या भावना वरिष्ठांना कळवुन त्यातुन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू असे लेखी पत्र दिल्या नंतर अंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी आबासो पवार, सदाशिव वाघमोडे, माऊली केदार, महेश धोत्रे, महेश चव्हाण, सतीश केदार, फंटु पाटील, प्रदीप सरवळे, जयप्रकाश मोरे उपस्थित होते.

Web Title: agitation stop by swabhimani shetkari sanghtana