शिक्षक नसल्याने शाळा भरली शाहुवाडी पंचायत समिती कार्यालयात

शिक्षक नसल्याने शाळा भरली शाहुवाडी पंचायत समिती कार्यालयात

शाहूवाडी - कुंभवडे (ता.शाहूवाडी) येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिक्षक नसलेने विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होते आहे. त्यामूळे ग्रामस्थांनी आज विद्यार्थासह थेट शाहूवाडी पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशाद्वारावरच शाळा भरवून प्रशासनाचा निषेध केला व शिक्षक देण्याची मागणी केली. त्यामूळे पंचायत समिती कार्यालयात एकच गोंधळ उडाला.

तालुक्याच्या अत्यंत दूर्गम भागात कुंभवडे गाव आहे. तेथे जिल्हा परिषदेची पाहिली ते आठवी पर्यंतची उच्च प्राथमिक शाळा असून ८८ विद्यार्थी आहेत.मात्र गेल्या जूनपासून म्हणजे तब्बल आठ महिने तेथे एकच शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही तीन शिक्षक शाळेकडे हजर झालेले नाहीत. तर एक शिक्षिका हजर होऊन रजेवर गेल्या आहेत. त्यामूळे शिक्षकांअभावी मुलांचे शैक्षाणिक नुकसान होते आहे.

याबाबत वारंवार तालुका व जिल्हा पातळीवर कळवूनही कोणीच दखल न घेतलेने आज ग्रामस्थांनी थेट पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यसह शाळा भरवली . त्यामूळे प्रशासनासह सर्वांचीच तारंबळा उडाली. शिक्षक नाहीत तर मुले शाळेला का पाठवायची असा प्रश्न विचारत शिक्षक दया अन्यथा आमची शाळा इथेच अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com