दुध उत्पादकांना न्याय दिल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही : रविकांत तुपकर

रुपेश कदम
रविवार, 15 जुलै 2018

मलवडी : फसव्या घोषणा देवून दुध उत्पादकांच्यात संभ्रम निर्माण करणार्या सरकारला माझं सांगणं आहे की दुध उत्पादकांना न्याय दिल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला.

मलवडी : फसव्या घोषणा देवून दुध उत्पादकांच्यात संभ्रम निर्माण करणार्या सरकारला माझं सांगणं आहे की दुध उत्पादकांना न्याय दिल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला.

दूधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे यासाठी स्वाभिमानीने सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दहिवडी  (ता. माण) येथे आयोजित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाशराव पोपळे, नांदेडचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव इंगोले, समीर जाधव, अभिजीत नायसे, चिन्मय कुबेर, वैभव महानवर, सयाजी मोरे, भैय्यासाहेब जाधव, राजू माने, बाबा खांडे, चैतन्य मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते.

रविकांत तुपकर म्हणाले की सरकार बदलंल तर नवीन काहीतरी घडेल असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. दूध उत्पादकाला दूध तोट्यात विकावं लागतंय. दुधापेक्षा पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त आहे. आपल्या हक्कासाठी भांडावं, झगडावं लागेल तरच न्याय मिळेल. सरकारची धोरणं ही शेतकरी व कष्टकर्यांना मारणारी तर अंबानी, अदानी यांना तारणारी आहेत.

रविकांत तुपकर पुढे म्हणाले की शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी पुकारलेल्या संपात काही मंत्र्यांनी फुट पाडण्याचा प्रयत्न केला होता. दुध आंदोलनात त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्याचं सोडून आंदोलनाची पध्दत शिकविण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांनी चार दिवस त्रास सहन करावा, सरकारला तुमच्या पाया पडायला लावलं नाही तर नाव सांगणार नाही.

रविकांत तुपकर पुढे म्हणाले की एखादं आंदोलन हाती घेतलं तर शेतकऱ्यांचा फायदा झाल्याशिवाय राजू शेट्टी माघार घेत नाहीत हा इतिहास आहे. पण या आंदोलनात कोणी सुर्याजी पिसाळ होवून पोलिस संरक्षणात कोणी दुध घालण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही. जिथं गांधीचा मार्ग समजत नाही तिथे भगतसिंगाचा

Web Title: The agitation will not stop till justice is given to the producers said ravikant tupkar