कांद्याच्या आरणी भरल्या

सनी सोनावळे 
मंगळवार, 22 मे 2018

कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बराखीमध्ये कांदे साठवायला सुरवात केली आहे. पारनेर तालुक्याच्या पठार भागातील गावात कांद्याच्या आरणी भरल्या आहेत. कांद्याला सुरवातीला बाजारभावाची साथ मिळाली. पंरतु, त्यानंतर मात्र बाजारभावात घसरण झाली. पठार भागावरील गोरेगाव, बहीरोबावाडी, किन्ही, कान्हुर पठार, विरोली, पाडळी यासंह अन्य ठिकाणी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. 

टाकळी ढोकेश्वर (नगर) - कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बराखीमध्ये कांदे साठवायला सुरवात केली आहे. पारनेर तालुक्याच्या पठार भागातील गावात कांद्याच्या आरणी भरल्या आहेत. कांद्याला सुरवातीला बाजारभावाची साथ मिळाली. पंरतु, त्यानंतर मात्र बाजारभावात घसरण झाली. पठार भागावरील गोरेगाव, बहीरोबावाडी, किन्ही, कान्हुर पठार, विरोली, पाडळी यासंह अन्य ठिकाणी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. 

गेली दोन तीन वर्षे कांद्याने शेतकऱ्यांची निराशाच केली यंदा शेतकऱ्यांना कांदा पिकाकडुन मोठ्या अपेक्षा होत्या, पंरतु सध्या कांद्याला 10 किलोला 60 ते 70 रूपये भाव मिळत आहे हा बाजारभाव कमी आहे सध्या मजुरीचे पैसा देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. पुढील दिवसांमध्ये रमजान सणही सुरू होतो. त्यामुळे कांद्याला निश्चित बाजारभाव चांगला मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदे आरणीमध्ये साठवायला सुरवात केली आहे. 

कृषी विभागामार्फत कांदा साठवणीसाठी अनुदान म्हणून 87 हजार 500 रूपये दिले जातात यावर्षी तालुक्यात आतापर्यंत 225 कांदाचाळींना अनुदान दिले शेतकऱ्यांनी  या अनुदानाचा लाभ घेऊन जास्तीत जास्त कांदा साठवून अपेक्षित भाव आल्यानंतर तो विक्रीसाठी काढावा, असे मत कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर मध्यप्रदेश व दक्षिण भागातील राज्यातील कांदा मोठ्या प्रमाणावर शिल्लक असल्याने तेथील व्यापारी खरेदीसाठी बाहेर पडत नाही त्यामुळे कांद्याचे भाव उतरले आहेत तो माल संपल्यानंतर भावात वाढ होईल असे मत पारनेर बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केले. तसेच प्रसन्ना कृषी मार्केटचे अध्यक्ष किरण डेरे आणि शेतकरी नेते अनिल देठे यांनीही यावेळी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Web Title: agricultere ralated news in parner