बेळगावात खत विक्री करणाऱ्या पाच दुकानदारांना कृषी खात्याने दिला दणका ...

अमृत वेताळ
गुरुवार, 21 मे 2020

लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार असल्याने शेतीसाठी लागणारे कृषी साहित्य शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी खाते सज्ज झाले आहे

बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) खत विक्री करणाऱ्या पाच दुकानदारांना कृषी खात्याने दणका दिला आहे. दर्जाहिन खाताची विक्री करणे, कृषी खात्यांच्या निर्देषांचे पालन न करणे, कॅश बुक, स्टॉक, बुक न लिहिने आदी कारणावरुन त्यांना कारणे दाखवा नोटीस (शो कॉज) बजावण्यात आली आहे. कृषी अधिकाऱ्यांनी अचानक दुकांनाना भेट देउन कारवाई करण्यास सुरुवात केल्याने तालुक्‍यातील खतविक्री करणाऱ्या दुकानदारांमध्ये देखील खळबळ उडाली आहे. कृषी खात्याच्या नियमांचे पालन करत चांगल्याप्रतिची बियाणे आणि खतपुरवठा करण्यात यावा. अन्यथा तशा दुकानदारांना कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा कृषी खात्याने देण्यात आला आहे. 

लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार असल्याने शेतीसाठी लागणारे कृषी साहित्य शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी खाते सज्ज झाले आहे. पेरणी काळात शेतकऱ्यांना बियाने आणि खाताची कमतरता भासू नये, यासाठी साठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार खते आणि बियाणे उपलब्ध व्हावीत, त्यांची फसगत होउ नये, यासाठी कृषी खात्याचे पथक सध्या दुकानांना भेटी देउन पाहणी करीत आहेत.

हेही वाचा- ब्रेकिंग - कोल्हापूरात आणखी सापडले सात कोरोना पॉझिटिव्ह......

एपीएमसी येथील खत विक्रि दुकानाना भेट देउन खताच्या दर्जाची नुकतीच पाहणी करण्यात आली. दोषी आढळून आलेल्या वितरकांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. विक्री करण्यात येत असलेल्या खातांचे नमुने घेउन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दर्जाहिन खातांची विक्री करणाऱ्या केंद्राना नोटीस बजावून ताबडतोब तशा खतांची विक्री थांबविण्याची सुचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर कॅश बुक, स्टॉक, बुक न लिहिने आदी कारणावरुन पाच दुकानाना शो कॉज नोटीस बजावण्यात आल्याने खत विक्रेत्यामध्ये खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा-रत्नागिरीत शुक्रवारपासून बस, रिक्षा वाहतूक, सलूनसह या सेवा सुरु होणार पण या आहेत अटी...

एपीएमसी आवारात कृषी साहित्य आणि खत विक्री करणाऱ्यांना दुकानाना भेट देउन पाहणी करण्यात येत आहे. पथकामध्ये आपणासह कृषी खात्याचे संचालन कार्यालयातील अधिकारी आर. बी. पाटील, आर. बी. नायकर, सी. एस. होगार, मंगळा बिरादार, राजशेखर भट्ट यांचा समावेश आहे. पाहणीदरम्यान दोषी आढळून आलेल्या दुकानाना नोटीस बजावण्यात येत आहे. आता तालुक्‍यातील दुकानांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. 
जे. बी. कल्याणी, उपसंचालक कृषी खाते बेळगाव तालुका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture department slaps five shopkeepers selling fertilizer in Belgaum ..