तुम्हाला 'स्मार्ट किसान' बनायचे आहे....?

Agriculture Farmer Registration  Smart Kisan Mobile App Sangli Marathi News
Agriculture Farmer Registration  Smart Kisan Mobile App Sangli Marathi News

सांगली : शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर शेतपिकांची नोंद सोपी झालेली आहे. स्मार्ट किसान लाईक करून फेसबुक पेजला जाता येते. शेतकरी प्रत्यक्ष शेतावर जाऊन मोबाईल ऍपद्वारे फोटो काढून तो अपलोड करावा लागतो. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून मोबाईल ऍप विकसित केले आहे. राज्यातील बारामती, कामठी, अचलपूर, फुलंब्री, दिंडोरी, वाडा तालुक्‍यात त्यांची प्रोयोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू केली आहे. मोबाईल ऍपद्वारे शेतकरी आपल्या शेतातील पिकांची माहिती तलाठ्यांना कळवतील.

त्यानंतर तलाठी 15 दिवसांत प्रत्यक्ष शेतावर जाऊन स्थळ पाहणी करून पीक पाहणी करतात. राज्यभरात लवकरच मोबाईल ऍपद्वारे पिकांची नोंदीची पद्धत लागू केली जाऊ शकेल. शेतात पेरलेल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. शेतकरी प्रत्यक्ष शेतावर जाऊन मोबाईल ऍपद्वारे फोटो काढून तो अपलोड करतील. या मोबाईल ऍपमध्ये अक्षांक्ष व रेखांशची नोंद होणार असल्याने शेताचे स्थानही समजणार आहे. 


पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर 
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्‍यात, नागपूर जिल्ह्यातील कामठी, अमरावतीमधील अचलपूर, औरंगाबादमधील फुलंब्री, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्‍यात मोबाईल ऍपद्वारे शेतकरी आपल्या शेतातील पिकांची माहिती तलाठ्यांना कळवत आहेत. त्यानंतर तलाठी 15 दिवसांत प्रत्यक्ष शेतावर जाऊन स्थळ पाहणी करून पीक पाहणी करतात. तलाठ्यांकडून या फोटो व स्थानाची पडताळणी होणार असून, त्यानंतर शेतातील पिकांची नोंद संबधित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राज्यातील बारामतीसह सहा तालुक्‍यांमध्ये राबवण्यात येत आहे. 

हेही वाचा - अजित पवार म्हणतात राजकारणात शब्दाला महत्त्व नसते? -
पारदर्शकता येण्यासाठी ऍप गरजेचे
गाव पातळीवरून पीक पेरणी अहवालाचा खरोखर व वास्तववादी माहिती संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच ही माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्यप्रकारे मदत करणे शक्‍य व्हावे, या हेतूने पीक पेरणीबाबतची माहिती मोबाईल ऍपद्वारे सात-बारा उताऱ्यामध्ये नोंदवण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून मोबाईल ऍप विकसित केले आहे. 


नेमक्‍या नोंदीचा फायदा सर्वांनाच... 
शेतीविषयक बातमी व माहिती मिळविण्यासाठी 7447319934 हा नंबर SMART KISAN या नावाने save करून whatsapp वर Hi असा Massage पाठवावा लागतो. सांगली जिल्ह्यात ही योजना तातडीने सुरू झाल्यास तलाठी कार्यालयातील हेलपाटे बंद होऊन नेमक्‍या नोंदीचा फायदा सर्वांनाच होईल. सांगली जिल्ह्यात महापूर आणि त्यानंतर अवकाळी पाऊस पडला. त्यावेळी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांनी नुकसानीचे फोटो थेट ऍपवर पाठवले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com