परतीच्या पावसामुळे डाळिंब, द्राक्षे, मका यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Bharat-Bhalake
Bharat-Bhalake

मंगळवेढा - परतीच्या पावसामुळे तालुक्यातील खरीप व रब्बी हंगामातील पिकाबरोबर डाळिंब,द्राक्षे, मका यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे तालुक्यात शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला असून आज आ. भारत भालके यांनी कृषी व महसूलच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकसानग्रस्त  गावाची पाहणी केली.

दुष्काळामुळे तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात आला ज्या शेतकऱ्याकडे पाणी होते ते त्या पाण्यावर जगलेली पिके परतीच्या पावसाने झोडपून टाकली. कृषी, महसूल आणि पंचायत समितीकडे कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे कमी काळात हे पंचनामे करताना जिकरीचे ठरत आहे. यातून काही शेतकरी वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.आज ब्रह्मपुरी,माचणुर,मरवडे,

भालेवाडी,तळसंगी,रड्डे, रेवेवाडी,या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या  नुकसान झालेल्या पिकांची पाहणी शेतात जाऊन केली.शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांच्या सोबत तहसीलदार स्वप्नील रावडे,कृषी अधिकारी येस जांगळे, मंडल अधिकारी,तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक उपस्थित होते.ब्रह्मपुरी येथील सुनील प्रताप पाटील यांच्या शेतातील दोन एकर शेवंती, चार एकर झेंडू,दोन एकर द्राक्षे पिकांचे नुकसान झाले.तसेच सिद्धेश्वर भिवा कोकरे यांचा ऊस चे नुकसान झाले आहे माचनूर येथील महादेव श्रीमंत डोके यांच्या शेतातील कांद्याचे,मरवडे येथील दुर्योधन नाना गवळी, भालेवाडी,तळसंगी येथील अरुण दत्तात्रय गवळी यांच्या शेतातील कांदा चे नुकसान झाले आहे. तसेच रड्डे येथील चद्रकांत पुजारी चार एकर मका,शिलेदार यांची ज्वारी पाणी लागून खराब झाली आहे आणि रेवेवाडी येथील ब्रम्हदेव रेवे यांनी कापून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले. तर भोसे येथील गुरुदेव स्वामी या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे  खराब झालेले डाळिंबे  या पिकाची पाहणी करत बाधीत शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे तात्काळ करून त्यांच्या नुकसान भरपाईचा अहवाल तात्काळ वरिष्ठ अधिकाय्राना देवून निधी तात्काळ उपलब्ध करुन द्यावा अशा सूचना केल्या . दरम्यान गेल्या दोन वर्षापूर्वी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या अंकुश खताळ या शेतकऱ्यांच्या शेतकरी नुकसान भरपाई अद्याप मिळाले नाही त्यामुळे शासन या परतीच्या पावसाने बाधित झालेल्या शेतकय्राला मदतीची रक्कम कधी देणार हा ही सवाल या निमित्ताने बोलून दाखविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com